थोडंसं मनातलं.... "बलात्कार करणा-या नराधमांना ठार मारले पाहिजे" ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडंसं मनातलं....  "बलात्कार करणा-या नराधमांना ठार मारले पाहिजे" ॲड शिवाजी अण्णा कराळे

प्रथमतःच हाथरस, राजस्थान आणि कोपर्डी प्रकरणात अत्याचाराला बळी भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या सर्व नराधमांना लगेच ठार मारलं पाहिजे अशी पुरूष हक्क समिती अहमदनगर तर्फे  मागणी करतो.  

आपला भारत देश हा पुरुष प्रधान असला तरीही भारताला " भारत माता" म्हणून संबोधले जात आहे. अनेक जाती धर्माची बांधिलकी जपणारा देश म्हणून भारताची ख्याती आहे. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात माता भगिनींना अपमानास्पद वागणूक देणारे आणि अन्याय व अत्याचार करणा-याचा भर चौकात चौरंग केला जात होता. शत्रूच्या महिलेला मातेचा दर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती  संभाजी महाराज कुठे आणि आता स्वतः च्याच मुलीची अब्रु लुटणारे नराधम बाप कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काही नतद्रष्ट लोक भारताला बदनाम करण्याचे प्रयत्न करतातच. भारत देश हा अनेक साधू संताची भूमी आहे तशीच वेगवेगळ्या संस्कृती जपणारी भूमी आहे. परंतु याच पवित्र देशात आसाराम बापू, रजनिश, रामरहिम बाबा असेही काही कुपुत्र जन्माला आले आणि त्यांनी सर्व नातीच बदनाम केली. संपूर्ण भारतात माता भगिनींना छेडछाड करणे आणि सामुहिक बलात्कार करण्याचे अनेक ठिकाणी प्रकार घडतच आहे. दिल्लीत घडलेले निर्भया प्रकरण , सांगलीचे अमृता देशपांडे प्रकरण, मुंबई येथील महिला पत्रकारावर झालेला सामुहिक बलात्कार, हैदराबाद येथे घडलेला प्रियंका रेड्डी प्रकार आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील प्रकार ताजे असतानाच हाथरस मध्ये मनिषा वाल्मिकी नावाची तरूण कन्या सामुहिक बलात्काराची आणि हत्तेची बळी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थान मध्ये सुद्धा असाच सामुहिक बलात्काराचा एक घाणेरडा प्रकार घडला आहे.पण राजस्थान सरकारने त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही.  खरं तर स्री ही क्षणांची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. परंतु काही वासनांध नराधमांच्या वखवखलेल्या  नजरा कोवळ्या कळ्या कुस्करण्यात मर्दूमकी गाजवतात. आज मुलगी घरात सुद्धा सुरक्षित नाहीत. जवळच्या नातेवाईकांनीच मुलींना आपल्या वासनेची शिकार केल्याचे अनेक उदाहरणे घडलेली आहेत. मग कधी बापाच्या अत्याचाराला  सावत्र मुलगी बळी पडली तर कधी चुलत भावाने  बहिणीला पळविले तर कधी मामाने  भाचीला आपल्या वासनेची शिकार केले. नेमका विश्वास कोणत्या नात्यावर ठेवायचा हे समजतच नाही. विज्ञान युगात मोबाईल आणि चैनीत जगण्यासाठी सध्या मुल मुली कोणत्याही प्रकारची घाणेरडी कृत्ये करायला मागे पुढे पाहत नाहीत. निर्भया केस मधील सर्व नराधमांना फाशी दिली गेली तसेच कोपर्डी प्रकरणातील नराधमांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पण अजुनही त्यांना फाशी दिली नाही. आपल्या लोकशाही राज्यात कायदा सर्वश्रेष्ठ मानला जातो. आपण संविधानाचे पूजक आहोत. परंतु अशा अबला नारीची इज्जत जर चव्हाट्यावर येत असेल तर आपण तरी किती सहनशीलता दाखवायची. एखाद्या निरापराध तरूणीवर बलात्कार झाला आणि त्यात ती मयत झाली तर काही थर्ड्क्लास टिव्ही चॅनल दिवसभर तिच्यावर बलात्कार कसा झाला हे दाखवून तिला बदनाम करतात. असे चॅनल वाले सुद्धा रस्त्यावर नेऊन धोपटले पाहिजेत. असे काही प्रकार घडले की  मग राजकीय नेते मंडळी तर आपली पोळी भाजून घ्यायला तयारच असतात. एकमेकांवर चिखलफेक करतात आणि आपली प्रसिध्दी करून घेतात. वास्तविक पाहता ज्या राज्यात अशा सामुहिक बलात्कार किंवा बलात्काराच्या घटना घडत असतील तर तेथील सरकारने आणि पोलिस प्रशासन यांनी त्या नराधमांना ठार मारण्याचे आदेश दिले पाहिजेत. जर प्रियंका रेड्डी च्या आरोपींना हैद्राबाद पोलिस एन्काऊंटर करून ठार मारू शकतात, विकास दुबे सारख्या भयानक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमांना युपी पोलिस ठार करू शकतात तर मनिषा वाल्मिकी च्या आरोपींना युपी पोलिस का ठार मारत नाहीत हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत आहे. मनिषाचे तर अक्षरशः या नराधमांनी लचके तोडले आहेत. तिचे मणके तोडले,जीभ कापली आणि पोलिस प्रशासन यांनी तर तिचा मृतदेह रात्रीच राॅकेल टाकुन जाळला. वास्तविक  मनिषाचे नातेवाईक तिचा मृतदेह ताब्यात मिळावा म्हणून पोलिस प्रशासन यांचेसमोर हात जोडून नम्र विनंती करीत होते. मग तिचा मृतदेह नातेवाईकांना का सोपविला नाही? कोणत्या नराधमांना वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नात आहे? का फक्त ती दलीत समाजातील आहे म्हणून पोलिस प्रशासन यांनी अशी भूमिका घेतली आहे? हे आणि असे अनेक प्रश्न निर्माण होतात.आता तर पोलिस प्रशासन म्हणतंय की सामुहिक बलात्काराची घटना घडलीच नाही. तसा डाॅक्टरानी सुद्धा रिपोर्ट दिला आहे. युपी चे मुख्यमंत्री यांनी हाथरस येथील काही पोलिस अधिकारी यांना निलंबित केले आहे. तसेच आता टिव्ही वर बलात्काराची घटना ही कपोलकल्पीत असल्याचेही दाखवले जात आहे. हे काहीही असले तरी एक तरूण कन्या मयत झाली आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे तिला न्याय मिळालाच पाहिजे. या घाणेरड्या घटनेचा पुरूष हक्क समिती अहमदनगर जाहीर निषेध करत आहे.आपल्या देशात तर अनेक महिला संघटना आहेत, तसेच मानवाधिकार संघटनेचे तर पिक आले आहे, मग मनिषा वाल्मिकी वर झालेल्या सामुहिक बलात्कारा बद्दल का कोणी पुढे येत नाही आणि युपी सरकार व पोलिस यांना जाब विचारत नाही आणि दोषी पोलिस यांचेवर गुन्हा का दाखल करीत नाहीत. मित्रांनो थोर समाजसेवक अण्णा साहेब हजारे  यांनीच फक्त त्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी केली आहे. काल काँग्रेस चे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे हाथरस कडे जात असताना त्यांना अडविण्यात आले आणि पोलिसप्रशासन यांनी अपमानास्पद वागणूक दिली आहे. राजकारण अजुन किती खालच्या पातळीवर जाईल हे सांगता येत नाही. खरं तर आता समाजातच "प्रोटेक्शन फोर्स" तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुढे जर कोणात्याही समाजातील माता भगिनींना असे कोणी छेडले किंवा बलात्कार केला तर जागेवरच त्या निच नराधमांचा चौरंग करायलाच पाहिजे. मग पुढे पाहूया कायद्याचा भंग होतो की काय ते. आई बहिणीची इज्जत चव्हाट्यावर आणना-याला या पुढे माफी नका देऊ.  चित्रपट सृष्टीत सुद्धा असे अनेक अपप्रकार घडतात आणि नंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेश भट्ट सारखा नालायक म्हणतोय की,आलिया माझी मुलगी नसती तर मी तिच्याबरोबर लग्न केले असते,  त्याच्या मुलीच्या वयाच्या किती अभिनेत्रीना या नराधमांनी नासवले आहे. आता चित्रपट क्षेत्रातील एक एक मासा एनसीबी च्या गळाला लागलेला दिसेल. मी तर म्हणेन की नालायक, नराधम नटांचे आणि नट्याचे चित्रपट आपण पैसे मोजून का पहायचे. खरं सांगायचं तर आपण अशा नट नट्या यांचे चित्रपट पहाणे बंद केले पाहिजे. कधी कधी काही महिला विनाकारण ब्लॅकमेल करण्याचे हेतुने सुद्धा बलात्कार केल्याचे किंवा विनयभंग केल्याचे खोटे गुन्हे दाखल करतात. त्यावेळी त्या गुन्ह्याची खात्री करूनच गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. नाहीतर विनाकारण काही पुरूष सुद्धा अत्याचाराचे बळी ठरतील. मध्यंतरी एका किर्तनकार बाबांनी ज्या घरी त्याची सेवा केली त्या घरातीलच महिलेला पळवुन नेल्याची बातमी वाचली. तसेच अनेक आश्रमात आश्रया साठी आलेल्या महिला आणि मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळेच आसाराम बापू, रामरहिम बाबा इ. अजुनही जेलमध्ये सडत पडलेले आहेत. मग प्रश्न असा पडतो की सर्व सामान्य भोळीभाबडी जनतेनी विश्वास कुठे ठेवायचा?

एकीकडे तोंडाने देवाचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे स्रियांकडे घाणेरड्या वासनेने पहायचे यालाच म्हणतात "मुह मे राम और बगल मे छुरी" अस असतं व्हय कुठ. खरंच बलात्काराच्या गुन्हात फाशीची शिक्षा झालेल्या सर्व नराधमांना महामहिम राष्ट्रपती महोदय यांना त्वरीत फाशी देण्याचा आदेश पारीत केला पाहिजे तरच महिला भगिनींना कुठेतरी सुरक्षित वाटेल.   

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

जिल्हाध्यक्ष पुरूष हक्क समिती  अहमदनगर 

99 22 545 545

जाहिरात
Search
विडिओ
Recent News