अरे व्वा दौंडकरानी कोरोनाला गांभीर्याने घेतलेच,179 जणांच्या तपासणीत फक्त पाच रुग्ण,सर्वांचे अभिनंदन


अरे व्वा दौंडकरानी कोरोनाला गांभीर्याने घेतलेच,179 जणांच्या तपासणीत फक्त पाच रुग्ण,सर्वांचे अभिनंदन

विठ्ठल होले पुणे, दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात मागील आठ दिवसात रोजच दहा, बारा कधी तेरा असेच रुग्ण आढळले होते, त्याला कुठेतरी लगाम बसला आहे,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे,पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी लगेच कामाला सुरुवात करून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात ही योजना सुरू केली आहे,त्याचाही परिणाम जाणवू लागला आहे,ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे, परवा दौंड शहरात एकाच कुटुंबातील सात व्यक्ती पोझिटीव आले होते तर दोन दिवसा पूर्वी एक छोटेसे दोन वर्षाचे बाळ पोझिटीव आले होते त्यावेळी महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनल कडून भावनिक आवाहन करण्यात आले होते की दौंडकर आता तरी जागे व्हा, त्याची कुठेतरी नागरिकांनी दखल घेऊन काळजी घेण्यास सूरवात केल्याचे आजच्या रिपोर्ट वरून नक्कीच लक्षात येते.

आज दिनांक 2/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 179 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 5 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 174 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये 

महिला-- 2,पुरूष --3,प्रभाग -

दौंड शहर=3, ग्रामीण=2 हे पाच ही व्यक्ती 25  ते  75 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. कोरोना महामारी विषयी काळजी करू नका,फक्त काळजी घ्या,अफवा पसरवू नका,रुग्णांच्या घरातील व्यक्तींना मानसिक आधाराची गरज आहे ती द्या त्यांच्याकडे द्वेषाने पाहू नये,आम्ही आणि आमचा सर्व कर्मचारी स्टाफ आपल्या सेवेत कायम आहोत परंतू जनतेने सुद्धा सहकार्य करावे,शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी यावेळी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News