धारणगावात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी !!


धारणगावात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री या महापुरुषांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

सरपंच नानासाहेब चौधरी यांच्या हस्ते या थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच नानासाहेब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य जगन ननवरे, राजेंद्र जाधव, बबन निकम, शिवाजी थोरात, कर्मचारी नानासाहेब चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

देशात दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री,यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात येते. देशात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम, राबवुन साजरी केली जाते. महात्मा गांधी यांच्या साबरमती येथील आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर ठिकठिकाणी व्याख्यान मालेचे आयोजन करून थोर पुरूषांचा जिवनचरीत्राला उजाळा दिला जातो. परंतु कोरोना महामारीमुळे मोठया कार्यक्रमांना फाटा देऊन सर्वत्र साधेपणाने जयंती साजरी करण्यात येत आहे या पाश्र्वभूमीवर धारणगाव येथे  महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News