समाजाला आत्मसन्मान द्यायचा असेल तर रस्त्या वरच्या लढाईला पर्याय नाही !! अँड.नितीन पोळ


समाजाला आत्मसन्मान द्यायचा असेल तर रस्त्या वरच्या लढाईला पर्याय नाही !!   अँड.नितीन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

समाजाच्या शेवटच्या घटकाला सन्मान मिळून द्यायचा असेल तर रस्त्यावर च्या लढाई शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.

नेवासा ता घोगरगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत उभारलेला अण्णा भाऊ साठे क्रांती स्तंभ काढण्यात येऊ नये म्हणून आज लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र पोलीस व महसूल प्रशासन यांनी मोर्चाला परवानगी नाकारली व स्तंभ काढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित  ठेऊन या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले 

या प्रसंगी साहेबराव कनगरे यांनी प्रस्थाविक केले तर नेवासा तालुका अध्यक्ष अरुण कनगरे यांनी आभार मांडले 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाथरस येथील दलित मुलीवर शारीरिक अत्याचारा नंतर मृत्यू झाला असून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

या प्रसंगी बोलताना पोळ म्हणाले की आजही अनुसूचित जातीतील महिला भगिनी सुरक्षित नाही त्याच प्रमाणे आजही देशात या समाजातील महापुरुषांची व महिला भगिनींची विटंबना होत असून समाजाला आत्म सन्मान मिळवून द्यायचा असेल व आपल्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्यात प्रशासन कुचराई करत असेल आणि समाजाला आत्मसन्मान मिळवून द्यायचा असेल तर रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही

    लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे म्हणून समाजा तील विविध जिल्ह्यातील व राज्य पातळीवर अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरण व्हावे या विषयावर काम करणाऱ्या मातंग , मादीग, मांग गारुडी,मेहतर,डककल वार समाजाच्या वीस ते पंचवीस संघटना एकत्र येऊन शासनाला दहा लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे या मोहिमेची पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात करण्यात आली असून जास्तीत जास्त संघटना व समाज बांधवांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले 

 या प्रसंगी लोक स्वराज्य आंदोलनाचे तालुकाध्यक्ष अरुण कनगरे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कनगरे,कडूबाळ कनगरे,धनंजय कनगरे,रोहिदास कनगरे,प्रशांत कनगरे,भावराव कनगरे,कारभारी दणके,सुभाष कनगरे,बाबासाहेब अढांगळे,मनोहर कनगरे लक्ष्मण कनगरे आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमास मोठया संख्येने महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News