भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात प्रांत व तहसीलदारांना निवेदन


भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात प्रांत व तहसीलदारांना निवेदन

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना याबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

    गेल्या ७ महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून पत्रकार प्रशासनास सहकार्य करीत आहेत. तसेच कोरोनासंबंधित बातम्या देण्याचे प्रामाणिक काम पत्रकार करीत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी, शासनाच्यावतीने पत्रकारांचा ५० लाख रुपयांचा संरक्षण विमा उतरवण्यात यावा तसेच पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबीयांची देखील मेडिक्लेम पॉलिसी काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत अशा मागण्या भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

     याबाबत बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना याबाबत गुरुवार दि.१ आक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.                      

    यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, महंमद शेख, असिफ शेख, विकास कोकरे व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

       यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सध्या पत्रकारांसाठी बेड राखीव असल्याची माहिती सांगितली तसेच आता कोणत्याही प्रकारची याबाबत पत्रकारांना अडचण येणार नाही असेही सांगितले यावेळी त्यांच्या बरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे हे देखील याठिकाणी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News