बारामती- राशीन रोड वर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता - तेजस देवकाते


बारामती- राशीन रोड वर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता - तेजस देवकाते

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

बारामती राशीन या राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी मदनवाडी गावचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बारामती राशीन राज्यमार्गावर  लामजेवाडी शेटफळगढे, पिंपळे, मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ या गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी  वाहनचालकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे दुचाकी स्वरांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे त्यातून फार मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे 

    सध्या कोरोना महामारी आणि नुकतीच झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असून त्यातच 1 ऑक्टोंबर 2020 पासून गळीत हंगाम चालू होत आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या वाहनाचा अपघात होऊन उसाचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी व्यक्तिशः सार्वजनिक बांधकाम विभागावर निश्चित करण्यात येईल याची दक्षता घ्यावी*

  सदर राज्यमार्गावरील भिगवन बारामती राशीन व्यापारी व शैक्षणिक दृष्टी महत्त्वाचे असून बारामती एमआयडीसी या ठिकाणी मोठ्या कंपन्या देखील आहे यामुळे कामगार विद्यार्थी महिला अशा अनेकांची दळणवळणासाठी रोजच वर्दळ असते रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सर्वांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत 

यापूर्वीही फोनद्वारे अनेकदा स्थानिक अधिकारी यांना विनंती करण्यात आली परंतु पावसाचे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी दुर्लक्ष करत आहेत परंतु *पावसाळा सुरू होण्यायापूर्वीही या रोडच्या डागडुजी साठी किती तरी कोटी रुपयांचा निधी खर्ची केला आहे तरीही रस्त्याची अशाप्रकारे चाळण होणे हे चुकीच्या नियोजनाचे व बेजबाबदारपणाच्या कामाचे दर्शन आहे याबाबत आपण संबंधित शासकीय अधिकारी कॉन्टॅक्टर यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश द्यावेत

    या सर्व बाबींकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहून समस्यांचे निराकरण करावे व बारामती राशीन राज्यमहामार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्या संबंधी कार्यवाही करावी अन्यथा येणाऱ्या 15 दिवसात तीव्र आंदोलन करु याची दखल घ्यावी असा  देवकाते यांनी इशारा दिला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News