संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर यांचा Z 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार देऊन गौरव


 संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर यांचा Z 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार देऊन गौरव

कोराना आजार नियंत्रीत ठेवण्यकरीता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागु करण्यात आल्यापासुन एक सामाजिक बांधिलकी व आपण समाजाचे एक देणे लागतो या भावनेतुन पोलीस दलात काम करणारे एक समाजसेवक  व कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर विभाग यांनी कोरोना या संसर्ग जन्य आजाराचा अहमदनगर शहरात प्रादुर्भाव वाढत असतांना अहमदनगर शहर व परिसरात विविध समाजसेवी संघटनांच्या मदतीने गरवंतांना सुमारे 7,36,112 अन्नपाकिटे व 7,660 गरजवंत कुटुंबीयांना किराणा किट वाटप केले. तसेच महिलांना सखी किट वाटप, हॉटस्पॉट व कंटेनमेंन्ट झोन मधील मुक्या प्राण्यांना चारा वाटप केला. विदयार्थांना शालेय साहित्य वाटप केले. सर्व धर्मांच्या बांधवांना  कोरोना काळात संचारबंदी व प्रशासनाकडुन घालण्यात आलेल्या निर्बधामुळे घरात सण साजरे करावे लागत असल्याने त्यांच्यात गोडवा निर्माण करण्याचे उददेशाने गोड अन्न पदार्थांचे वाटप केले. 9 ट्रेन मधुन विविध राज्यांमध्ये 10,499 प्रवाशी व 212 बस मधुन 4,081 प्रवाशांना अन्न पाकीटे देवुन त्यांचा प्रवास सुखकर केला तसेच कर्नाटहुन राजस्थान येथे 62 बस मधुन प्रवास करणाऱ्या परप्रांतिय मजुर व विदयार्थींना पाणी फळे व इतर खादय पदार्थ पोहच केले. 726 सोन्याचे व्यापारी, कारागिरांना 20 मे 2020 रोजी रात्री 12 वाजता अन्न पाकीटे व पाणी वाटप केले.  सन 2020 श्री.गणेश उस्तव विसर्जन दरम्यान अहमदनगर शहर पोलीसांचे वतीने विसर्जन रथ ही संकल्पना मांडुन पोलीस शासकीय वाहनातुन श्री.गणेश मुर्तींचे संकलन करुन विसर्जन केले.

अशा प्रकारे पोलीस दलातील आपले कर्तव्य व समाजाप्रती असणरी आत्मयीता याचा मेळ राखत पोलीस दलातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणुन अहमदनगर शहर आपल्या कार्यातुन प्रतिमा तयार केली. 

श्री.संदिप  मिटके, हे करत असलेल्या कार्याची राज्यपातळीवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री.अनिल देशमुख साहेब यांनी दखल घेवुन त्यांचे कार्याचा गौरव केला तसेच आज दि. 02/10/2020 रोजी Z 24 या वृत्त वाहिनेने देखिल याची दखल घेवुन महाराष्ट्राची शान गौरव सोहळा या कार्यक्रमात मा.श्री.अनिल देशमुख साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री.सुबोध कुमार जायसवाल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, श्री.परमवीर सिंग पोलीस आयुक्त मुंबई, मा.श्री.दिपक पान्डये  पोलीस आयुक्त नाशिक यांचे उपस्थितीत श्री.संदिप मिटके, DYSP  नगर शहर विभाग,अहमदनगर यांचा " *महाराष्ट्राची शान* " या पुरस्काराने सन्मान केला आहे . व  "कोविडयोद्धा म्हणून गौरव करताना झी २४ तास ला अभिमान वाटतोय"  असे गौरवोद्गार काढले 

श्री.संदिप मिटके यांना मिळालेल्या सन्माना बददल                        श्री.राहुल व्दिवेदी जिल्हाधिकारी अहमदनगर , श्री.मनोज पाटील, पोलीस अधिक्षक अहमदनगर , श्री. सागर  पाटील अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच अहमदनगर शहरातील नागरीकांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News