अ .भा .वारकरी मंडळाच्या नगर तालुका गोपालक समिती सचिव पदी ह .भ.प . रोहीदास महाराज जाधव तसेच व्यसनमुक्ती समिती सचिव पदी ह.भ .प . सोमनाथ महाराज शिंदे यांची नियुक्ती


अ .भा .वारकरी मंडळाच्या नगर तालुका गोपालक समिती सचिव पदी ह .भ.प . रोहीदास महाराज जाधव तसेच व्यसनमुक्ती समिती सचिव पदी ह.भ .प . सोमनाथ महाराज शिंदे यांची नियुक्ती

अहमदनगर प्रतिनिधी ( संजय सावंत ) आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नगर तालुका गोपालक समितीचे सचिवपदी ह .भ.प . रोहीदास महाराज जाधव तसेच नगर तालुका अ .भा .वारकरी मंडळाच्या व्यसन मुक्ती समिती सचिव पदी ह .भ.प . सोमनाथ महाराज शिंदे यांची नुकतीच नियुक्ती करण्यांत आली . त्याच्या धार्मिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेवून वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह .भ. प . गणेश महाराज डोंगरे व प्रदेशाध्यक्ष ह .भ.प . अनिल महाराज वाळके यांनी जाधव व शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्तीचे पत्र दिले .अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह .भ.प . प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी वारकरी संप्रदायाच्या विचार धारेने कार्य करण्यासाठी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . जाधव महाराज व शिंदे महाराज हे उच्च शिक्षण ,सामाजिक , धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे सहभागी असणारे व्यक्तीमहत्व तसेच त्यांना बालवयापासूनच परमार्थाची आवड व वारकऱ्यासाठी तळमळ अशी त्यांच्या कार्याची पद्धत निवड झाल्यानंतर या दोन्ही महाराजांनी मिळालेल्या संधीचे सोने करू व वारकरी संघाचे सर्वाचे आभार मानले . निवडी बदल अ .भा . वारकरी मंडळाचे पदाधिकारी ह .भ.प . तुळशीराम महाराज लबडे शहराध्यक्ष , ह .भ.प . अमोल  महाराज सातपुते तालुका अध्यक्ष ,ह .भ.प . सुदाम महाराज दारकुंडे  कोषाध्यक्ष , ह .भ.प . हिराताई मोकाटे  ह .भ.प . छगन महाराज , ह .भ. प . अमोल महाराज जाधव सचिव नगर तालुका , अनाथ मुलाचे जिल्हाध्यक्ष विजय भालसिंग यांच्या सह विविध मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News