ज्येष्ठांनी आरोग्य टिकवणे गरजेचे : उद्धव शिंदे


ज्येष्ठांनी आरोग्य टिकवणे गरजेचे : उद्धव शिंदे

स्नेहबंध फौंडेशनतर्फे भिंगार येथे मोफत दंत तपासणी शिबीर...

अहमदनगर -(प्रतिनिधी संजय सावंत) दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकवणे गरजेचे आहे. ज्येष्ठांनी दातांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.

        स्नेहबंध फौंडेशन तर्फे भिंगार येथे आजी-आजोबा यांच्यासाठी मोफत दंत तपासणी शिबीर घेण्यात आले, त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी ४५ रुग्णांची तपासणी करून सर्वांना मास्क, सॅनिटायझर, मेडिसीन देण्यात आली. व तसेच ताप व ऑक्सिजन तपासणीही करण्यात आली. यावेळी साई डेन्टल क्लिनिकचे डॉ.अतुल मडावी, हेमंत ढाकेफळकर, सुभाष चंगेडे आदी उपस्थित होते. डॉ. मडावी म्हणाले, दातांमध्ये दुखणे असल्यास त्याची तपासणी व उपचार करून घ्यायला हवी. त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या दातांची नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News