"गेलं दौंड खड्डयात" !! भाग-1 (विशेष सदरात)


"गेलं दौंड खड्डयात" !! भाग-1 (विशेष सदरात)

विठ्ठल होले पुणे

या सदराखाली महाराष्ट्र भुमी चैनल अंतर्गत दौंड शहरासह तालुक्यातील खड्ड्यांची मालिका सुरू करत आहोत आपल्या आसपास जनतेला त्रास होणाऱ्या खड्ड्यांचे फोटो आणि माहिती आमच्या पर्यंत पोहचवा,आम्ही प्रशासना पर्यंत पोहचवू,पाठवणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

       ✒आजचा भाग -- 1

दौंड येथील सेंट्रल बँक समोरील साईड गटर आणि रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांचा अपघात होण्याचा संभव

प्रतिनिधी --- दौंड शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे आणि सेंट्रल बँक समोरील रस्ता सहा महिने झाले खोदून ठेवला होता या रस्त्यावर दौंड ची नगरपालिका,तालुक्याची पंचायत समिती,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,सेंट्रल बँक,दवाखाना आणि मोठी व्यापारी लाईन आहे परंतू दौंडकर नागरिकांकडे संयम खूपच मोठा आहे कोणालाही काहीही न बोलता येजा करत होते त्या रस्त्याचे आता कुठे निम्मे काम झाले होते तो पर्यंतच बँकसमोर खड्डा खोदून ठेवला आहे, आणि खड्डया जवळ कोणताही माहिती फलक लावलेला नाही,तरी शाळा सुरू नाहीत, नाहीतर किती विद्यार्थी तेथे जायबंदी झाले असते, गटर साठी उंच केलेल्या भागाच्या आणि रस्त्याच्या मध्ये खड्डा तसाच ठेवला आहे,सेंट्रल बँकेत पेंशन साठी ज्येष्ठ नागरिक सतत येत असतात त्याठिकाणी जाण्यास त्यांना  त्रास होत आहे,बँकेचे कर्मचारी आत मध्ये ग्राहकांशी उद्ध्ट बोलतात ते बाहेर काय लक्ष देणार,दौंड प्रशासनाने या ठिकाणी मोठा अपघात होण्याअगोदर लक्ष द्यावे अशी जनतेतून मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News