बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
हाथरस येथील सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा व आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना गुरुवार दि.११ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा तसेच या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, आसिफ शेख, महंमद शेख, विकास कोकरे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.