रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे अभिलेख तयार करणार : पोलीस अधीक्षक मनोज पाटील


रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे अभिलेख तयार करणार : पोलीस अधीक्षक मनोज पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) 

वाळू तस्करी च्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी वाढत आहे नगर जिल्ह्यात याचे प्रमाण गंभीर आहे त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी वाळू तस्करी वरील कारवाई माझी प्रायोरीटी राहील. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे मागील पाच वर्षाचे गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांचा अभिलेख तयार करणार आहे, असे प्रतिपादन नगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी केले. श्री पाटील यांनी नगरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.पोलीस व जनता यांच्यात संवाद वाढवण्याचा माझा विशेष प्रयत्न राहील असे त्यांनी आवर्जून सांगितले. श्री पाटील यांची पोलीस दलात बावीस वर्षांची सेवा झाली आहे याआधी त्यांनी जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, भिवंडी, सोलापूर येथे काम केले आहे. सोलापूर येथे त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांचे सर्विस शीट त्या कर्मचाऱ्यांना मोबाईलवर उपलब्ध करून दिले होते या सर्व्हिस शीटच्या माध्यमातून संबंधित पोलिसाच्या नोकरी संदर्भातील सर्व माहिती दिली होती याशिवाय इ-टपाल योजनेतून त्यांनी प्रत्येक पोलिस स्टेशनच्या बाहेर फलक लावून त्या पोलीस स्टेशनमध्ये कोणती कामे प्रलंबित आहेत, ती कुठल्या स्टेजला आहेत, कुठल्या परवानग्या देणे बाकी आहे अशा अनुषंगाने माहिती प्रसिद्ध करून जनतेला दिली होती. या दोन्ही योजना नगर जिल्ह्यातील राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. चोरी, घरफोडी, दरोडे अपघात व अन्य प्रकारची गुन्हेगारी राज्यात सगळीकडे आहे तशी ती नगरला ही आहे मात्र येथे वाळू तस्करी तुन संघटीत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे ते रोखण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले, पोलीस सेवा लोकांपर्यंत पोचवणे याला महत्त्व देणार आहे . पोलीस स्टेशनला आलेल्या सामान्य नागरिकाला त्याचे काम होणार की नाही हे स्पष्टपणे सांगितले जावे, पोलीस स्टेशन व डीवायएसपी किंवा एस पी कार्यालयांमध्ये त्याला चकरा मारण्याची वेळ येऊ नये त्यादृष्टीने नियोजन करणार आहे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लागणे यालाही प्राधान्य असणार आहे. पोलीस वेल्फेअर विषयाच्या अनुषंगाने पोलिसांच्या घरांचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल याशिवाय पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारना, त्यांना वेळच्या वेळी सुट्ट्या तसेच त्यांच्या कुटुंबांच्या समस्या सोडवायला प्राधान्य देणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे मागील पाच वर्षाचे गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांचा अभिलेख तयार करणार आहे त्यानुसार त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करणार आहे, सध्या सर्वत्र सायबर गुन्हेगारी चा प्रमाण वाढले आहे या संदर्भातील अज्ञाना मुळे गैरफायदा घेऊन फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्यामुळे अशा प्रकारांतील गुन्हेगारांचा शोध घेण्याबरोबरच सायबर क्राईम रोखण्यासाठी नागरिकांमध्येही अवेरनेस निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न करणार आहे असे पाटील यांनी सांगितले. पोलिसांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप बाबत बोलताना ते म्हणाले सर्वसामान्य वरील अन्याय दूर व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केले तर त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले पोलिसांवरील कारवाई ही दुर्दैवी गोष्ट असते त्यामुळे पोलिसांच्या चांगल्या कामाची प्रशंसा व वाईट काम केले तर आणि नियम तोडले तर कारवाई करून सुधारणे ला संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे .नगर जिल्ह्यात काम करताना पोलीस प्रिन्सिपल नुसार काम करण्यास प्राधान्य देणार आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News