धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,अल्पवयीन मुलासह तीन जण अटक, लोणीकंद पोलीस आणि LCB ची धडाकेबाज कामगिरी


 धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,अल्पवयीन मुलासह तीन जण अटक, लोणीकंद पोलीस आणि LCB ची धडाकेबाज कामगिरी

विठ्ठल होले पुणे

पुणे प्रतिनिधी -- दिनांक 23/9/20 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास वाघोली गावच्या हद्दीतील वाकोरी फाटा येथे तीन जणांनी औरंगाबाद येथे जायचे आहे.

असे सांगून भाडे तत्वावर मिळणाऱ्या गाड्यांच्या चालकाला बोलवून घेऊन एका सोसायटीच्या खाली घेऊन जाऊन त्यांना  गळ्याला दोरी लावून चाकू कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी पर्दाफाश केला आहे,त्यामध्ये एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे,23/9/2020 रोजी *लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा र नं 856/2020 भा द वी 392,365,34 वरील गुन्हा दि 23/9/2020 रोजी घडला होता* वरील गुन्ह्यात भाड्याने गाडी बोलावून ड्रायव्हर ला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देऊन मारुती सुजूकी कंपनीची इर्टीगा कार तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि गुगल पे वरून रोख रक्कम 10000 घेऊन आरोपी पसार झाले होते, त्यानुसार समांतर तपास करीत असताना मिळालेल्या माहिती वरून कोरेगाव भीमा येथे सापळा रचून इसम नामे *भूषण शरद माळी वय 19 वर्षे रा वाडा पुनर्वसन  ता शिरूर जि पुणे 2) सागर नवनाथ पिंगळे वय 25 आणि एक अल्पवयीन मुलगा* यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरच्या आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेला  रियल मी कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे रु 2000  तसेच  गुन्हा करताना वापरलेली  होंडा ड्रीम युगा कंपनीची मोटार सायकल की अंदाजे रु 25000  असा एकूण की रु 27000 चा जप्त केला असून सदरील गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हा देखील शिक्रापूर पोलिस स्टेशन शार्प कंपनी च्या मागील गेट च्या जवळ एका इसमास कोयत्याचा धाक दाखवून चोरलेला आहे. 

तसेच सदरच्या मोबाईल मधील सिम कार्ड देखील शिक्रापूर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील हरगुडे वस्ती येथे एक इसमास कोयत्याचा धाक दाखवून चोरी केलेले आहे  सदरील दोन्ही गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली असून शिक्रापूर पोलिस स्टेशन ला कळविण्यात आले आहे वरील सर्व गुन्हे आरोपीने त्याचा लहान  भाऊ आणि सागर  पिंगळे वय 25वर्षे रावाडा पुनर्वसन ता शिरूर यांच्या सहकार्याने केले असल्याचे सांगत आहे  सदरील आरोपी अटक करण्याची तजवीज ठेवली आहे सदर आरोपीस पुढील तपास करीता  लोणीकंद पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे  सदरील कारवाई ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे , पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक राजू मोमिन पोलिस शिपाई धिरज जाधव यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News