कुरकुंभ | शिवशक्ती केमिकल कंपनीत भीषण आग


कुरकुंभ | शिवशक्ती केमिकल कंपनीत भीषण आग

कुरकुंभ:प्रतिनिधी कुरकुंभ  (ता.दौंड) औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती केमिकल कंपनीला दि.१ रोजी रात्री २:०० वाजता अचानक आग लागली. आगीचे प्रमाण एवढे मोठया प्रमाणात होते की,कुरकुंभ पासून १० ते १२ कि. मी. अंतरावर आकाशामध्ये आगीचे गोळे दिसत असल्याने नागरिकांची झोप उडाली.आगीचे प्रमाण मोठया प्रमाणात असल्याने कुरकुंभ, पांढरेवाडी जवळील नागरिक घाबरून गेले होते. शिवशक्ती केमिकल कंपनीतील घातक रसायनांचा साठा आणि अचानक लागलेल्या आगीमुळे हवेतील प्रदूषण  आणि दुर्गंधीयुक्त वासामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी-तील लोकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला. केमिकल कंपनीतील आग जास्त प्रमाणात असल्याने कंपनीतील घातक रसायनांचा साठा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला. आगीचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी खूप वेळ लागला. वारंवार होत असलेले कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील  कंपनीत अँक्सीडेंट आणि स्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. अचानक वारंवार स्फोट होत असल्याने मानवी जीवन धोक्यात येत आहे . प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.सदर कंपनीत कोणतीही जीवितहानी झाली नाही असे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.दौंड नगरपालिकेतील,औद्योगिक वसाहतीमधील आग विझविण्यासाठी अग्निबंब बोलावले होते.कंपनीतील शॉर्टसर्किट झाल्यामुळे हीआग लागली होती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News