उपजिल्हा रुग्णालय येथील रिपोर्टची अपडेट आहे,मात्र खाजगी दवाखान्याचे रिपोर्ट अंधारात?


उपजिल्हा रुग्णालय येथील रिपोर्टची अपडेट आहे,मात्र  खाजगी दवाखान्याचे रिपोर्ट अंधारात?

विठ्ठल होले दौंड प्रतिनिधी:

दौंड शहरासह तालुक्यातील कोरोना चे रिपोर्ट तेथील डॉक्टर रोजच्या रोज पत्रकरा मार्फत जनते पर्यंत पोहचवत आहेत, परंतू खाजगी दवाखान्याचे रिपोर्ट माहित होत नाहीत,त्यांच्याकडे किती रुग्ण पोझिटीव आहेत,किती रुग्णांना ठीक होऊन घरी सोडण्यात आले आणि महत्वाचे म्हणजे किती रुग्ण कोरोना मुळे दगावले याची काहीही माहिती उपलब्ध होत नाही,खाजगी दवाखान्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्या जास्त आहे,हे फक्त सरकारी अकडे जनते पर्यंत पोहचत आहेत.आज दिनांक 1/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 95 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले,पैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 88 व्यक्तीचे report negative आले आहेत.

Positive मध्ये महिला-- 1, पुरुष - 6 आहेत,त्यापैकी शहरातील 4 तर परिसरातील 3 व्यक्ती असून 16 ते 75 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.तर ग्रामीण भागातील 30/9/20 रोजी घश्या तीन स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी फक्त 3 व्यक्ती कोरोना बाधीत असून 61जण निगेटिव्ह आले आहेत,त्यामध्ये पारगाव - 2, तांबेवडी - 1 त्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत, 60 ते 68 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ इरवडकर यांनी सांगितले आहे.हे सर्व आकडे सरकारी दवाखान्यात तपासण्यात आले आहेत, परंतू खाजगी दवाखान्यात किती रुग्ण उपचार घेत आहेत,किती डिस्चार्ज मिळाला आहे,किती रुग्ण दगावले याची माहिती जनते पर्यंत पोहचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत,ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसात कमी होत आहे सर्वांनी मिळून अशीच काळजी घेतली तर लवकरच कोरोना वर मात करण्यात यशस्वी होऊ असे डॉ राजेश पाखरे म्हणाले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News