अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची अ.भा. वारकरी मंडळाच्या नगर तालुका सार्वजनिक मंदिर कमिटीच्या उपप्रमुखपदी नियुक्ता करण्यात आली. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे व प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके यांनी भालसिंग यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्ती पत्र दिले.
अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी वारकरी संप्रदायाच्या विचार धारेने कार्य करण्यासाठी भालसिंग यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भालसिंग हे एस.टी. बँकेची नोकरी करीत असताना सामाजिक भावनेने कार्य करीत आहे. त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले असून, वारकरी मंडळाच्या मंडळाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे ह.भ.प. तुळशीराम लबडे महाराज, ह.भ.प. अमोल महाराज सातपुते, ह.भ.प. स्वप्निल महाराज पवार, ह.भ.प. हिराताई मोकाटे, ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे, ह.भ.प. अमोल महाराज जाधव आदिंनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.