गरीबी निर्मूलन समितीतर्फे महिला बचतगटांना कर्जमाफी देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन


गरीबी निर्मूलन समितीतर्फे महिला बचतगटांना कर्जमाफी देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

पुणे विठ्ठल होले दौंड प्रतिनिधी:

दौंड तालुक्यातील गावांमध्ये गरीब महिलांचे अनेक बचतगट कार्यरत असून त्या माध्यमातून महिला कामधंदा करत घरखर्चासाठी आर्थिक मदतीची तरतूद करत असतात. अशातच काही खाजगी व सरकारी बँका त्यांना कर्ज देतात. सदर कर्जफेड या महिला आपापल्यापरीने करत असतात. तालुक्यातील अशाच महिला बचत गटांनी काही खाजगी व सरकारी बँकांकडून कर्ज घेतले असून त्याचा हप्ता या महिला फेडतही आल्या आहेत. परंतु, सध्याच्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने कष्टकरी महिलांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत गरीब महिला बँकांचे कर्ज वा हप्ते फेडण्यास असमर्थ आहेत. अशातच बँकांनी लॉकडाऊन काळातल्या न भरता आलेल्या हप्त्यांवर अतिरिक्त वाढीव व्याज आकारणी सुरू केली आहे. याबाबतीत महिलांनी बँकांना अनेकदा विनवणी करूनही त्यांचे वसुली अधिकारी सदर महिलांच्या घरी जाऊन दिवस-दिवसभर बसत आहेत व कर्जवसुलीसाठी दमदाटी करत आहेत. हप्ते फेडा अन्यथा घरजप्ती आणू, पोलीस केस करू, तुमचे नांव काळ्या यादीत टाकू अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे सदर महिला सध्या मानसिक दडपणाखाली वावरत असून त्यांना आपल्याच घरात असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे सदर महिलांनी अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीपुढे आपले गाऱ्हाणे मांडले. गरीब महिलांची सद्यपरिस्थिती जाणून घेत अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती पुणे जिल्हा यांच्यातर्फे समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत सदर महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता व शासन दरबारी त्यांचे म्हणणे पोहोचविण्यासाठी बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी दौंडच्या तहसीलदार व नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल झेंडे, दौंड तालुकाध्यक्ष विलास खरात, उपाध्यक्ष दादा साळवे व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News