दौंड तालुक्यात फक्त एकच रुग्ण तर शहरात 13 रुग्ण,दोन वर्षाचे मूल पॉझिटीव्ह आले, आता तरी जागे व्हा!!


दौंड तालुक्यात फक्त एकच रुग्ण तर शहरात 13 रुग्ण,दोन वर्षाचे मूल पॉझिटीव्ह आले, आता तरी जागे व्हा!!

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दोन वर्षाचे ते मुल कुठे कुठे फिरले असेल! त्याला कोरोना झाला,ज्यांच्या घरात रुग्ण आढळले त्यांच्या घरी जाऊन पहा वास्तव काय आहे ते,आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे त्यांनी खूप काही मोठा गुन्हा केला आहे असे पाहतात,त्यांना मानसिक आधाराची गरज आहे ती द्या,त्यांच्याकडे पहिल्या नंतर कळेल की खरच कोरोना जवळ आला आहे,दौंडकर नागरिकांनी थोडे गांभीर्य ओळखून व्यवहार केले पाहिजेत,कारण आपल्या बाहेर फिरण्या मुळे घरातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे,घरातील ज्येष्ठ व्यक्ती समजून सांगण्यास गेली तर मला काही होत नाही,हा फाजील आत्मविश्वास सोडून द्या,आणि स्वतः बरोबर घरातल्या व्यक्तींची काळजी घ्या,आजच्या रिपोर्ट मध्ये 9 महिला आणि दोन वर्षाचे बाळ हे घरा बाहेर गेले असतील का? हा विचार शांतपणे करा आपण कुठेतरी चुकत आहोत,यंगिस्तान तर खूपच पुढे आहेत,डबल सीट,ट्रीपल सीट गाडीवर फिरताना पोलीस पकडतात म्हणून दुसऱ्या चौकातून जायचे पण बाहेर जायचेच,वाढदिवस,पार्ट्या जोरात सुरू आहेत,तुमच्या शरीरात ताकद असल्यामुळे कोरोना होऊन गेला तरी समजणार नाही परंतू घरातील ज्येष्ठ,महिला,लहान मुले यांना तुमच्यामुळे बाधा पोहचत आहे,आजच्या रिपोर्ट मधुन हेच सिद्ध होते आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढे लक्षात ठेवा. 30/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 90 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले.

पैकी एकूण 21व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 69 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये महिला-- 9,पुरूष --12,प्रभाग -दौंड शहर=13, ग्रामीण=8 असे रुग्ण आहेत. ते सर्वजण2 वर्ष ते  62 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.तर 29/9/20 रोजी      ग्रामीण भागातील 119 लोकांचे घश्यातील स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी फक्त एकच व्यक्ती ती पण महिलाच पोझिटीव आली आहे.तर 118 लोक निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती डॉ इरवाडकर यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News