शिक्षक बॅंकेत सत्ता आणून सदिच्छा मंडळाला गतवैभव मिळवून देणार - माधव हासे


शिक्षक बॅंकेत सत्ता आणून सदिच्छा मंडळाला गतवैभव मिळवून देणार - माधव हासे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

गुरूकूल मंडळ व गुरूमाऊली मंडळाचा भ्रष्ट कारभार सभासदांनी पाहिला. ही दोन्ही मंडळे विश्वासघातकी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बॅंकेत सभासद हितासाठी सदिच्छा मंडळाची सत्ता आणून शिक्षक बॅंक व सदिच्छा मंडळाचे पुर्वीचे गतवैभव आपण मिळवून देऊ. असा विश्वास जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे ( शिवाजीराव पाटील गट ) नुतन जिल्हाध्यक्ष माधव हासे यांनी व्यक्त केला.

शेवगाव येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीतील पदाधि-यांचा सत्कार समारंभ मंगळवारी ( दि. २९ ) सोशल डिस्टन्स पाळत पार पडला. या वेळी शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख विष्णूपंत खांदवे यांचे बंधू कै. त्रिंबक खांदवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी हासे बोलत होते.

या वेळी हासे, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नुतन नारायण राऊत, सरचिटणीस बाळासाहेब डमाळ, भाऊराव जावळे, संजय काळे, हरिचंद्र बडे, सुधिर शेळके, रमेश खरात, शंकर ढोबळे, कारभारी नाचन, रविंद्र घनवट, बाळकृष्ण कंठाळी, बबन ढाकणे, देविदास कोकाटे, अर्जून शिरसाठ आदी नुतन जिल्हा कार्यकारिणी पदाधि-यांचा सत्कार करण्यात आला.

हासे म्हणाले,  कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणा-या व ऑनलाईन, गृहभेटीने शिक्षण सुरू ठेवणा-या नगर जिल्ह्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन दोन महिने उशीराने होत आहे.  हे दरमहा वेतन वेळेवर करण्यात यावे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच मंत्री थोरात यांच्या माध्यमातून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीचा प्रश्न आपण सोडविला.

सदिच्छा मंडळाचे नुतन जिल्हाध्यक्ष म्हणाले, सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाने सदिच्छा मंडळाच्या काळातील स्ट्रॉंग रूम व कोअर बॅंकिगची चौकशी निबंधक, सहकार आयुक्त यांच्याकडे केली. परंतु, चौकशीत काहीही तथ्य आढळले नाही.  शताब्दी वर्षात गुरूमाऊलीने गरज नसताही घड्याळ खरेदी करून सभासदांना वाटप करून भ्रष्टाचार केला.

माजी संचालक विनोद फलके म्हणाले, ज्येष्ठ नेते विष्णूपंत खांदवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राजेंद्र शिंदे, रविंद्र पिंपळे व श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली  शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ नव्या उमेदीने उभे राहिले आहे. येत्या निवडणुकीत सदिच्छा मंडळ मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल.

या वेळी शिक्षक नेते राजू ढोले,  रहिमान शेख, राजेंद्र कुदनर, कैलास वर्पे, दादा वाघ, भारत कोठुळे, नितीन जाधव, बाळासाहेब चाबुकस्वार, भाऊसाहेब कबाडी, चंद्रकांत कर्पे आदींसह सदिच्छा प्रेमी उपस्थित होते.   शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नांगरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बबनराव ढाकणे यांनी केले तर रामनाथ खरड यांनी आभार मानले

सभासदांच्या पैशांतून गडंगण्यारावर खर्च....

गुरूमाऊली मंडळाच्या श्रीगोंदा व इतर तालुक्यातील काही पदाधिका-यांनी मुलीच्या लग्नातील कन्यादान, गडंगण्यार यासाठी प्राथमिक शिक्षक बॅंकेतील सभासदांचा पैसा खर्च केला असा आरोप सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी केला.

---------------------------------------------------------------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News