कोपरगाव नगरपरीषद अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चार दिवस बंद !!


कोपरगाव नगरपरीषद अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चार दिवस बंद !!

संजय भारतीकोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यात तसेच शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ असुन आता कोपरगाव नगरपरिषदेत सुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने दि १ ऑक्टोबर २०२० ते ४ ऑक्टोबर २०२० पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोपरगाव नगरपरिषद बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी सफाई कामगार विविध उपाय योजना करत आहे. तसेच नागरिकांना नियमितपणे विविध आरोग्य पुरावली जात असुन या दरम्यान   विविध कारणामुळे विविध व्यक्तींचा संपर्क येतो त्यातूनच नगरपरिषदेचे काही अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यामुळे दिनांक १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२० हे चार दिवस या नगरपरिषद कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात येत आहे.अशी माहिती मुख्यधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News