ढोरजळगाव - कोपरे रस्त्याच्या कामात अनियमतीतता - प्रा. किसन चव्हाण


ढोरजळगाव - कोपरे रस्त्याच्या कामात अनियमतीतता - प्रा. किसन चव्हाण

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगाव तालुक्यातील  ढोरजळगाव ते कोपरे रस्त्याचे अपुर्ण राहिलेले काम व अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सीडी वर्क न झाल्याच्या  निषेधार्थ सोमवारी ( दि. १२ ऑक्टोबर ) प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांच्या नगर येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य निमंत्रक प्रा.किसन चव्हाण यांनी दिला आहे.

या बाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ढोरजळगाव ते कोपरे या रस्त्याचे काम ढोरजळगावातच अपुर्ण आहे. अंदाजपत्रकात तरतूद असूनदेखीलही ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले, ओढे आहेत. तेथे पाईप टाकून सीडीवर्क केलेले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी अनेक शेतक-यांच्या शेतात, घरात घुसून अतोनात नुकसान झाले आहे. तसेच वडुले खुर्द येथील संत वामनभाऊ विद्यालयातही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. यास सबंधित ठेकेदार व अभियंता हे जबाबदार आहेत.

या कामाची चौकशी होऊन अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार या रस्त्याचे काम सीडी वर्कसह दर्जेदार करावे तसेच शेतक-यांच्या नुकसनीस ठेकेदार  व अभियंता यांच्यावर कारवाई व्हावी  अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे शेतक-यांसह तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रा. चव्हाण यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी तसेच नगर शहरातील पोलिस ठाण्याला पाठविण्यात आल्या आहेत. प्रा. चव्हाण यांच्यासह टायगर फोर्सचे जिल्हाध्यक्ष योगेश गुंजाळ यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

-------------------------------------------------

दि. ३० सप्टेंबर )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News