संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुल स्टेट बोर्डची भारत सरकारच्या फिट इंडिया फ्रीडम रन मूवमेंट मध्ये प्रथम नोंदणी !! सौ. रेणुका विवेक कोल्हे


संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुल स्टेट बोर्डची भारत सरकारच्या फिट इंडिया फ्रीडम रन मूवमेंट मध्ये प्रथम नोंदणी !!   सौ. रेणुका विवेक कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगांव - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ऑगस्ट महिन्यात फिट इंडिया फ़्रीडम रन या उपक्रमाची सुरुवात झाली असुन यात देशभरात दोन लाखांपेक्षा जास्त शाळांनी देखील नोंदणी केली. यात संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल कोपरगाव तालुक्यातील पहिली स्टेट बोर्ड स्कुलने देखील भारत सरकारच्या फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये प्रथम नोंदणी केली असल्याची माहिती संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी दिली.

 सदर उपक्रमाची माहिती देतांना सौ.रेणुका कोल्हे म्हणाले की, व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते नियमीत व्यायामाकिरता प्रोत्साहित करण्यासाठी आणि लट्ठपणा, आळस, तणाव,चिंता आदि आजार इत्यादी पासुन मुक्त होण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट फ्रिडम इंडिया रन हा उपक्रम 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभरात राबवल्या जात आहे. केलेल्या आवाहनानुसार संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलच्या वतीने जागतिक हदय दिनानिमीत्ताचे औचित्य साधुन दिनांक 26 व 27 सप्टेंबर या दोन दिवसाचे व्हर्चुअल मॅरोथाॅन मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी स्कुलच्या वतीने पालक, आजी माजी विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी यांच्या नागिरकांना आवाहन करण्यात आले त्यानुसार या उपक्रमात 387 सदस्यांनी ऑनलाईन नोंद केली. शाळेने 500 कि.मी. टार्गेट ठेवले परंतु दिलेल्या टार्गेटपेक्षा शाळेने 714.06 कि.मी.आॕनलाईन नोंद झाली आहे.  

सदरचे उपक्रम हे आयोजित केलेल्या दिवसापुरतीच मर्यादीत होती यादिवशी कुठेही, कधीही धावु/चालु शकता’ प्रत्येक जण धावण्यासाठी,चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीशःअनुकुल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालु शकणार, प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणे किंवा चालण्याची मुभा होती, स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रायकिंग ॲप किंवा जीपीएस घडळयाचा वापर करण्याची परवानगी होती. सदर उपक्रमाचे सर्वांनीच मनसोक्त आनंद घेवुन मोठया संख्येने सहभाग नोंदविला त्याचबरोबर भारत सरकारने असे अनेक उपक्रम यापुढे ही आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात यावे अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी केली. या उपक्रमात सहभागी झालेले सर्वच सदस्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले. या उपक्रमाबाबत शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे साहेब, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, विश्वस्त माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी सरकारने राबविलेला उपक्रम अतिशय योग्य व तो सर्वांच्या आरोग्यसाठी फायदेशीर असुन संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुल माध्यमातुन राबविण्यात आलेला उपक्रमाची प्रशांसा करुन मुलांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News