मॉर्निंग वॉक व सायकलींगला गेल्याचा बहाणा करुन पत्नीने केला पतीचा खुन, गुन्हे शाखा, युनिट 5 ने केला गुन्हा उघड


मॉर्निंग वॉक व सायकलींगला गेल्याचा बहाणा करुन पत्नीने केला पतीचा खुन, गुन्हे शाखा, युनिट 5 ने केला गुन्हा उघड

विठ्ठल होले पुणे

पुणे प्रतिनिधी --- सतत त्रास देणाऱ्या नवऱ्याचा 20 वर्षीय पत्नीने कोणाचीही मदत न घेता चार दिवस हत्येचा प्लॅन करून चोरीचा बनाव रचून पतीची हत्या केली, परंतू गुन्हे शाखा युनिट 5 च्या चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेतून हा बनाव लपला नाही आणि पत्नीने केलेला पतीच्या  हत्येचा बनाव उघड झाला.त्याची सविस्तर माहिती अशी की  दि 29/09/2020 रोजी सकाळी 07.15 चे सुमारास देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील मामुर्डी या गावामध्ये इसम नामे मयुर गोविंद गायकवाड याचे डोक्यामध्ये व गळयावर फावडयाने वार करुन त्यास जबर जखमा करुन त्याला ठार करण्यात आले होते. सदर घटनेबाबत देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 685/2020 भारतीय दंड विधान कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन घटनास्थळी श्री सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांनी भेट दिली होती.  

गुन्हे शाखा, युनिट 5 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट 5 कडील सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामिनाथ जाधव यांचे तपास पथकाने मयताची पत्नी रुतु मयुर गायकवाड, वय 20 वर्षे, रा भैरोबामंदिराचे मागे, मामुर्डी, देहुरोड पुणे हिला विश्वासामध्ये घेवुन सखोल तपास केला असता तीने तीला तीच्या नवऱ्याकडुन नेहमीच लैंगिक छळ होत होता. सदर त्रासाबाबत तीने अनेकदा तीचा नवरा, तीची सासु, सासरचे नातेवाईक तसेच आई वडील यांना सांगुनही तीची सुटका होत नव्हती. सदर त्रासातुन सुटण्याकरीता पतीला संपवणे हाच एक मार्ग तिला वाटत होता. त्यावरुन तिने 04 दिवसांपासुन प्लॅन करुन तीचे शेजारी राहणारी एक महिला व काही लहान मुले यांचेसह मॉर्निंग वॉकला जाणे सुरू केले. ती नवरा एकटा घरी असण्याची वाट पाहु लागली. दि 28/09/2020 रोजी संध्याकाळी तीच्या सासुला रात्रपाळी डयुटी करीता जावे लागले तसेच तीचा दिर हा घरी येणार नव्हता याची माहिती होती, तसेच तीचा पती मयुर याने रात्री उशीरा 11.00 वाजणेचे सुमारास दारु पिवुन जेवण केले तो पुर्ण नशेमध्ये होता त्याच संधीची ती वाट पहात होती. तीने रात्रभर नवरा झोपला असताना त्याला संपविण्याबाबत अनेकदा विचार केला शेवटी तीने सकाळी नेहमीप्रमाणे शेजारीण व लहान मुले यांचे बरोबर मॉर्निंग वॉकला जावुन मॉर्निंग वॉक वरुन परत येवुन पती मयुर गोविंद गायकवाड हा झोपेमध्ये असताना घरातील फावडे त्याचे डोक्यामध्ये घालुन त्यास त्याचे हाताला धरुन सरळ करुन फावडयाचे पुढील बाजुने गळयावर वार करुन त्याची हत्या केली. पतीला मारताना तीच्या जिन्स पॅन्टवर उडालेले रक्त तिने पाण्याणे साफ करुन पुन्हा त्याच लहान मुलांना सोबत घेवुन सायकलींग करण्याकरीता जावुन पुन्हा घरी येवुन आपण घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी पतीची हत्या केल्याचा बनाव करुन मोठयाने आरडोओरडा करुन शेजारीपाजारी गोळा झाले असल्याचे पाहुन बेशुध्द पडल्याचा बहाणा केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तीने तीच्या पतीचा खुन कोणीतरी चोरीचे उद्देशाने केला असल्याचे सांगुन दिशाभुल केली. आरोपी नामे रुतु मयुर गायकवाड हिस दाखल गुन्हयांचे पुढील तपासकामी देहुरोड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. 

सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे व पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, गणेश मालुसरे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News