संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सहा अंगणवाडीतील मुलांकरिता अन्न शिजवण्यासाठी सर्व प्रकारची भांडी भेट देण्यात आली.
तसेच 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रू१,८०,००० किंमतीचे LED TV संच माजी सरपंच केशवराव होन यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच महिला व मुलींकरता विविध स्वरूपाचे कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी माजी सरपंच केशवराव होन,सरपंच पुनम खरात,उपसरपंच विजय होन, ज्ञानेश्वर होन, राहुल होन, दिलीपराव होन, आनंदरावजी होन, सुनील होन, मराठी शाळा स्टाफ, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्त उपस्थित होते.
माजी सरपंच यांचा मार्गदर्शनाखाली चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गुणवंत विद्यार्थाचा सत्कार, अंत्यविधीसाठी मोफत साहीत्य वाटप अशा अनेक सामाजिक.उपक्रम राबविले असुन कारो ना महामारीचा काळ तही नागरीकांना त्यांनी मोठा आधार दिला आहे. या उपक्रमाचे चांदेकसारे पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे .