वारकरी सांप्रदायाचे भूषण आदरणीय भागवताचार्य ह.भ.प . तुळशीराम लबंडे महाराज यांना वाढदिवसांच्या ऑनलाईन शुभेच्छाचा वर्षाव


वारकरी सांप्रदायाचे भूषण आदरणीय भागवताचार्य ह.भ.प . तुळशीराम लबंडे महाराज यांना वाढदिवसांच्या ऑनलाईन शुभेच्छाचा वर्षाव

अहमदनगर प्रतिनिधी ( संजय सांवत ) आखिल भारतीय वारकरी सांप्रदाय नगर शहराचे शहरअध्यक्ष भातोडी पारगावचे लोकप्रिय भूषण आदरणीय भागवताचार्य ह.भ.प .तुळशीराम लबंडे महाराज हे आपल्या मधूरवाणीतून किर्तन , प्रवचन , श्रीमद भागवत कथेतून तरुण वर्गाना नवीन दिशा देऱ्यांचे संदेश देतात . त्यांचा व्यसन मुक्ती वर जास्त प्रभाव असल्याने अनेक तरुण व्यसनातून मुक्त झालेले आहेत . त्यांचे अहमदनगर शहरासह नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम झालेले असून मुळातच लबंडे महाराज हे एक आदर्श शिक्षक असल्याने त्यांना राज्यस्तरीय विविध पुरस्कार मिळालेले आहेत .त्यांना समाजाविषयी आपुलकी असल्याने समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून ते महान कार्य करीत आहेत . अशा या थोर महान किर्तनकारांचा आज वाढदिवस असल्याने वारकरी सांप्रदायाचे भूषण आदरणीय भागवताचार्य ह.भ.प .तुळशीराम लबडे महाराज यांना अहमदनगर जिल्हातील आखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे पदाधिकारी ह .भ.प . अमोल महाराज सातपुते , ह.भ.प . सुदाम महाराज दारकुंडे ,ह.भ.प . हिराताई मोकाटे ह.भ.प . अनिल महाराज वाळके यांच्या सह विविध स्तरातून त्यांना ऑनलाईन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News