सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालणार्‍या 4 ऑनलाईन सत्संगां चे 150 भाग पूर्ण : सव्वा कोटींहून अधिक दर्शकांनी घेतला लाभ !


सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालणार्‍या 4 ऑनलाईन सत्संगां चे 150 भाग पूर्ण : सव्वा कोटींहून अधिक दर्शकांनी घेतला लाभ  !

विठ्ठल होले पुणे, प्रतिनिधी -- सनातनची .ऑनलाईन सत्संग शृंखला : आपत्काळातील संजीवनी !

        सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती धर्म आणि अध्यात्म प्रसारासाठी अव्याहतपणे कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जेव्हा दळणवळण बंदी लागू करण्यात आली, तेव्हा धर्मप्रसाराच्या पारंपारिक पर्यायांवर अचानकपणे मर्यादा आल्या. सर्व जणच घरात अडकल्याने दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले. जनजीवन पूर्ववत् कधी होणार याविषयी अनिश्‍चितता आहे. कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या समाजाला त्या काळी खर्‍या अर्थाने मनोबल आणि आत्मिक बल यांची आवश्यकता होती. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पहिली .जनता संचारबंदी. लागू केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच .ऑनलाईन सत्संग शृंखला. चालू केली. या सत्संग मालिकेच्या अंतर्गत प्रतिदिन .नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग आणि धर्मसंवाद अशा चार सत्संगांचे फेसबूक आणि यू-ट्यूब यांवरून थेट प्रसारण आरंभले. विशेष म्हणजे या क्षेत्राचा विशेष पूर्वानुभव नसतांनाही हा सत्संगरूपी ज्ञानस्त्रोत अव्याहतपणे चालू आहे. या चारही सत्संगांचे 150 भाग पूर्ण झाले असून सत्संगांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमात दर्शकांनी वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय व्यक्त करत त्यांना या सत्संगांचा लाभ होत असल्याचे सांगितले आहे. सध्या दळणवळण बंदी उठवण्याची प्रक्रिया चालू झाली असली, तरी एक प्रकारचे भय आणि चिंता यांचे वातावरण अजूनही आहे. या पार्श्‍वभूमीवर ही .ऑनलाईन सत्संग शृंखला. दर्शकांसाठी खर्‍या अर्थाने संजीवनी ठरत आहे 29 मार्चपासून चालू झालेल्या हे चारही सत्संग आतापर्यंत एकूण सव्वा कोटीहून अधिक जणांनी पाहिले. (29 मार्च ते 23 सप्टेंबरपर्यंतची प्रत्यक्ष आकडेवारी - 1 कोटी 41 लाख 22 हजार 743) सरासरी पाहिली, तर प्रतिदिन चार सत्संग मिळून साधारण 80 हजारांहून अधिक जण पहातात. असे दिसून येते. हे सत्संग अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याची ही साक्ष आहे. हिंदी भाषेतील .ऑनलाईन सत्संग लोकप्रिय झाल्यानंतर दर्शकांच्या मागणीनुसार ते कन्नड, मल्याळम् तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्येही चालू करण्यात आले. नामसत्संग अर्थात् नामजप सत्संगामध्ये साधना, साधनेचे महत्त्व यांची सूत्रे सांगितली जातात, तसेच अध्यात्मविषयक शंकानिरसनही केले जाते, तसेच प्रत्यक्ष नामजप करवून घेतला जातो. सण-उत्सव-व्रते या अनुषंगाने सत्संगांमध्ये त्यांचे शास्त्रही सांगण्यात आले. या सत्संगामध्ये आतापर्यंत नामजप कोणता करावा . नामजपाचे कार्य. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी काय करावे ? नामसाधनेमध्ये प्रार्थनेेचे महत्त्व.साधनेचे महत्त्व.नमस्काराच्या योग्य पद्धती.टिळा लावण्याचे महत्त्व .अध्यात्मविषयक शंकाचे निरसन आदी विषय हाताळण्यात आले आहेत. नामजप सत्संगामध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव हे स्वतः नामजप करतात. संतांचा सत्संग आणि चैतन्य यांमुळे अनेक दर्शकांना नामजप करतांना मनातील विचार उणावणेे, मन शांत होणे, सकारात्मकता वाढणे, अशा प्रकारचे अनुभव आल्याचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत.बालसंस्कारवर्गाच्या माध्यमातून लहान मुलांवर सुसंस्कार व्हावेत, त्यांना शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये धर्म आणि राष्ट्र प्रेम निर्माण व्हावे, या दृष्टीने दिशादर्शन केले जाते. देवता, संत, राष्ट्रपुरुष यांच्या कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्माचरणी करण्याचा प्रयत्न केला जातो. बालसंस्कारवर्ग ऐकायला आरंभ केल्यापासून लहान मुलांना चांगल्या सवयी जडल्याचे पालकांनी आयोजकांना आवर्जून कळवले आहे. स्वतःमध्ये नेतृत्वगुण कसा वाढवावा .विद्यार्थीजीवन आदर्श कसे बनवावे .व्यवस्थितपणा हा गुण कसा वाढवावा .दैनंदिन आचरण सुसंस्कारित कसे करावे  .स्वतःतील अयोग्य सवयी आणि स्वभावदोष कसे दूर करावेत. असे विषय हाताळण्यासह बालसंस्कारवर्गांमधून संत, क्रांतीकारक यांच्या प्रेरणादायी कथाही सांगितल्या जातात. आदर्श आणि सुसंस्कारित पिढी निर्माण करणारा बालसंस्कारवर्ग हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

भावसत्संगांच्या माध्यमातून संत आणि भक्त यांच्या भगवंताप्रतीच्या उत्कट भावाचे दर्शन घडवणारी उदाहरणे, मानसपूजा, भावजागृतीचे विविध प्रयत्न सांगितले जातात. भाव तेथे देव.देव हा भावाचा भुकेला आहे. अशी शिकवण संतांनी दिली आहे. ईश्‍वरप्राप्ती महत्त्वपूर्ण असलेला हा भाव. कसा निर्माण करायचा, कसा वृद्धींगत करायचा, याची शिकवण देणारा भावसत्संग दर्शकांना निराळ्याच भावविश्‍वात घेऊन जातो. ईश्‍वराविषयी अवीट गोडी निर्माण करतो. भावसत्संगामध्ये आतापर्यंत आत्मनिवेदनभक्ती.भगवंताच्या अलौकिक लीला.भावजागृतीसाठी कृतज्ञतेचे महत्त्व, शरणागती. समर्पणभाव. निष्काम भक्ती आदी विषय घेण्यात आले आहेत. भवसागर पार करण्यासाठी श्रद्धा.च आवश्यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हा भावसत्संग म्हणजे एकप्रकारे दर्शक आणि भगवंत यांच्यामधील दुवाच बनला आहे. धर्मसंवाद या सत्संगाच्या माध्यमातून धर्मविषयक अमूल्य ज्ञानाचे साध्या-सोप्या भाषेत विश्‍लेषण केले जाते. तसेच विविध राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि अन्य समस्यांवर धर्मशास्त्रांच्या दृष्टीने कसे प्रयत्न करायचे, हे सांगितले जाते. धर्मसंवादाच्या माध्यमातून आतापर्यंत कर्मफल सिद्धांत. ज्योतिषशास्त्र : महत्त्व आणि लाभ.श्राद्धामागील धर्मविज्ञान. तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म. सोळा संस्कार.साम्यवाद्यांकडून झालेली शिक्षणव्यवस्थेची हानी.प्राचीन खगोलशास्त्रात भारताचे योगदान.प्राचीन भारताची आदर्श शिक्षणव्यवस्था.अंकगणित आणि कालगणना. आदी विषयांवर सखोल माहिती देण्यात आली. त्यातून प्राचीन ज्ञानावर प्रकाश टाकण्यात आला. 

ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह त्याची वाट शोधतोच. त्याप्रमाणे सनातन ज्ञानगंगाही स्थळ-काळाचे बंधन ओलांडून अविरत वहात आहेत. उलट ऑनलाईन सत्संगां.च्या माध्यमातून हा प्रवाह अधिक गतीने आणि वेगाने प्रसारित होत असल्याचे अनुभवायला मिळत आहे. सनातन संस्था जेव्हा आपत्काळाविषयी सांगत होती, तेव्हा समाजातील अनेक जणांना ती अतिशयोक्ती वाटली मात्र कोरोना महामारी चालू झाली तेव्हा समाजातील अनेक जणांनी .सनातन वाणी. सत्य असल्याची प्रचिती आल्याचे आवर्जून सांगितले. ऑनलाईन सत्संग शृंखले मुळे अनेक जणांच्या साधनेच्या प्रयत्नांना आरंभ झाला तसेच अनेकांची साधनेच्या प्रयत्नांची गती वाढली. त्यामुळे ऑनलाईन सत्संग शृंखला’ म्हणजे दर्शकांना ज्ञानामृत देणारी ज्ञानगंगा ही कृतीशील करणारी आहे, असे म्हणावे लागेल. 

सत्संगाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात दर्शकांनी व्यक्त केलेले अभिप्राय ! 

 काम करण्यापूर्वी प्रार्थना आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करणे : बालसंस्कारवर्ग ऐकायला आरंभ केल्यापासून माझे राग येण्याचे प्रमाण उणावले आहे. आता मी कोणतेही काम करण्यापूर्वी प्रार्थना आणि त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करत आहे. - कु. आकांक्षा पाटील, पुणे 

 प्रत्येक कृती व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करणे : बालसंस्कारवर्ग ऐकायला आरंभ केल्यापासून मी प्रत्येक कृती व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतो. आईला साहाय्य करतो तसेच धर्माचरण करत आहे. - कु. देवव्रत मराठे. पुणे 

 मन शांत आणि प्रफुल्लित होणे : भावसत्संग ऐकल्यानंतर मन शांत होते. सत्संगानंतर 2-3 घंटे माझे मन प्रफुल्लित रहाते. काम करतांना भगवंताचे स्मरण कसे करावे, संत कशा प्रकारे भक्ती करत होते अशी पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली. सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी काम करतांना नामजप करायचा प्रयत्न करते. त्यातून मला समाधान मिळत आहे. - प्रियांका चाळके, मुंबई. 

 भावसत्संगानंतर सतत श्रीकृष्णाच्या चरणांचे स्मरण होणे : भावसत्संग ऐकतांना पुष्कळ छान वाटते. सत्संग संपूच नये असे वाटते. आमच्या घरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे. भावसत्संगातील एक कथा ऐकल्यापासून मला सतत माझे मन श्रीकृष्णाच्या चरणीच रहावे, असे वाटते आणि श्रीकृष्णाच्या चरणांचे स्मरण होते. - सौ. उषा क्षोत्री, मुंबई

 सत्संगामुळे जीवनाकडे पहाण्याची दृष्टी पालटणे : सत्संग ऐकल्यावर नामजप प्रभावीपणे कसा करायचा.हे शिकायला मिळाले. त्याप्रमाणे नामजप करायला लागल्यानंतर माझ्यामध्ये अनेक सकारात्मक पालट अनुभवायला मिळाले. या सत्संगांमुळे माझी जीवनाकडे पहाण्याची दृष्टीच पालटली. आज समाजात आध्यात्मिक शिक्षणाची कमतरता आहे. सनातन संस्था आध्यात्मिक शिक्षण देण्याचे कार्य चांगल्या प्रकारे करत आहे. या सत्संगांविषयी मी संस्थेचा आभारी आहे. - श्री. विपिन कौशिक, गुडगाव हरियाणा

 नामजपामुळे अशांत मन शांत होणे : मला नेहमी अशांत वाटायचे. कोणत्याच कामात लक्ष लागायचे नाही. मी जेव्हापासून नामजप करायला लागलो, तेव्हापासून इष्टदेवतेप्रतीची श्रद्धा वाढली आणि कामात लक्ष वाढले. मन शांत वाटते. - श्री. मनीष बंजारा, जोधपूर, राजस्थान

 सत्संगामुळे ईश्‍वर जवळच असल्याची जाणीव होणे : नामजप सत्संग हा एक उत्कृष्ट प्रेरणादायी सत्संग असून अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सत्संगामुळे ईश्‍वर जवळच असल्याची जाणीव होते. - सौ. माधवी दामले, मध्यप्रदेश 

 घर चैतन्यदायी वाटणे : सत्संगामुळे मनःशांती मिळाल्याचे जाणवते. घरातही पुष्कळ सकारात्मक आणि चैतन्यदायी वाटते. मुलेही नामजप करतात. मन शांत होते. घरात चैतन्य वाटते. - प्रिया पृथी, नवी दिल्ली 

 थकव्याचे प्रमाण उणावणे : सत्संगातून उत्साह आणि आनंद मिळतो. नामजप करतांना काम केल्याने थकवा येत नाही. - सौ. अंजली कुलकर्णी, ठाणे

 सत्संग पाहण्यासाठी वेळा आणि पुढील मार्गिका (links) दिलेल्या आहेत. त्याच सर्वांनी लाभ घ्यावा . नामजप सत्संग : सकाळी 10.30 आणि पुनर्प्रसारण सायं. 4.00 वा.

 भावसत्संग : दुपारी 2.30 वा.

 बालसंस्कार वर्ग : सायं. 6.00

धर्मसंवाद : सायं. 7.00 वा. पुनर्प्रसारण (दुसर्‍या दिवशी) दुपारी 1.00 वा. 

Link:              Youtube.com/HinduJagrut Facebook.com/HinduAdhiveshan* Youtube.com/SanatanSanstha1

जाहिरात
Search
विडिओ
Recent News