दौंड येथील तरुण मंडळाच्या अनोख्या गांधीगिरीला पोलीसच आले मदतीला,पाच दिवसाचा खड्डा बुजगवण्यामुळे एकाच दिवसात बुजवला


दौंड येथील  तरुण मंडळाच्या अनोख्या गांधीगिरीला पोलीसच आले मदतीला,पाच दिवसाचा खड्डा बुजगवण्यामुळे  एकाच दिवसात बुजवला

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- जगाच्या पाठीवर फक्त तडजोड केलेल्या कामाची मोडतोड करणे फक्त आणि फक्त दौंड शहरातच होते,रस्त्याचे काम पूर्ण होत आल्यानंतर ठेकेदाराला आठवते की अरे अमुक एक केबल, अमुक पाइपलाइन, गटार पाईप टाकायचे राहिलेच,आणि या कारणासाठी अगोदरच निकृष्ट दर्जाचा असलेला रस्ता पुन्हा उकरून त्या ठिकाणी खड्डा तयार होऊन पाणी साचत राहते आणि हे फक्त दौंड शहरातच होऊ शकते हे आता दौंडकरानी ओळखले आहे.याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे,दौंड शहरातील गाजलेल्या कुरकुंभ मोरी समोर एका ठेकेदाराने केबल कामासाठी मोठा खड्डा खोदून त्याच्यासमोर कोणताही लोकांच्या सुरक्षे विषयी  माहिती फलक न लावता पाच दिवसांपासून तसाच ठेवला होता त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक,महिला लहान मुले यांचे खड्डयात पडून जखमी झाले होते, परंतू येथील झुंज मित्र मंडळाच्या तरुणांनी ठेकेदार सांगून ऐकणार नाही त्यामुळे एक बुजगावणे तयार करून "ठेकेदार उठलाय निष्पाप लोकांच्या जीवावर" रोज होताहेत अपघात, अशा आशयाचा फलक लावून अनोख्या पद्धतीने   गांधीगिरी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला,या अनोख्या गांधीगिरी ची दखल दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घेतली आणि   सदर ठेकेदारास बोलवून घेऊन  कडक शब्दात खडसावले,आणि त्या ठेकेदार बरोबर पोलीस पाठवून रेल्वे कर्मचारी आणि त्याचे खाजगी कर्मचारी यांच्याकडून तातडीने तो खड्डा बुजवून घेतला,त्यामुळे झुंज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.याची हकिकत अशी की सदर ठेकेदार याने रेल्वे हद्दीतील  खाजगी केबल टाकण्यासाठी रेल्वे प्रशासन यांचे कडे परवानगी घेतली परंतू ते काम रेल्वे कर्मचारी असताना करून घेतले पाहिजे असे सांगितले,परंतु शहरात येणारा मुख्य रस्ता खोदण्या अगोदर तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,नगरपरिषद किंवा पंचायत समिती यापैकी ज्यांची परवानगी लागत असेल त्यांच्याकडून ती न घेता पाच दिवसांपासून केबल टाकण्याचे काम सुरू होते,खड्डा खोदत असताना सायंकाळी काम थांबल्या नंतर तेथे माहिती फलक लावणे आवश्यक असताना रहदारीच्या रस्त्यावर कोणतीही सुरक्षा न घेता हजगर्जी पणा दाखवला त्यामुळे बऱ्याच लोकांचे अचानक खड्डा दिसल्यामुळे अपघात झाले,त्यात कहर म्हणजे त्या खड्डयात पाणी साचले होते,नशीब कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतू त्या परिसरातील झुंज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनोखी शक्कल लढवली आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागात पशू पक्षी घालवण्यासाठी वापरले जाणारे बुजगावणे तयार करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याठिकाणी लावण्यात आले आणि झाले ही तसेच हे बुजगावणे एका दिवसात शोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले,याची दखल दौंड पोलिसांनी घेतली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी त्या ठेकेदारास बोलवून घेऊन खडसावले त्यामुळे पाच दिवस खोदून पडलेला खड्डा एका बुजगावण्यामुळे 24 तासाच्या आत बुजवण्यात आला.या अनोख्या गांधीगिरी मुळे दौंड मध्ये झुंज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे,यावेळी यातील एका कार्यकर्त्याने सांगितले की सर्व तरुणांनी असे जागरूक झाले पाहिजे ,व्हॉट्स अप,फेसबुक, इंस्टाग्रामवर  काहीतरी चॅटिंग करण्यापेक्षा सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे,आणि वेळोवेळी प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे म्हणजे असे प्रश्न मार्गी लागतील असेही ते यावेळी म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News