संघटनाविरोधी काम केल्याबद्दल राज्य संघटक तैमूर शेख,जिल्हा उपाध्यक्ष विकास शेलार यांचे सह दोन संचालकांची संघातून हकालपट्टी


संघटनाविरोधी काम केल्याबद्दल राज्य संघटक तैमूर शेख,जिल्हा उपाध्यक्ष विकास शेलार यांचे सह दोन संचालकांची संघातून हकालपट्टी

विठ्ठल होले पुणे

प्रतिनिधी --- कर्मयोगी सुभाष अण्णा कुल दौंड तालुका प्राथमिक शिक्षक  पतसंस्था चेअरमन निवडीत भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संचालक व पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष  विकास  शेलार  यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याच्या आरोपावरून त्यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच संघाचे राज्य संघटक तैमूर शेख आणि इतर दोन संचालक यांच्यावर ही प्राथमिक शिक्षक संघाने कारवाई करून हकाल पट्टी करण्यात आली आहे, या सर्वांना संघटनेतून पदमुक्त करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी सांगितले आहे.

या निर्णयामुळे विकास शेलार यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही शिक्षकांची सर्वात मोठी संघटना असून अप्पासाहेब कुल हे संघाचे राज्य सरचिटणीस आहेत. विकास शेलार यांच्या हकालपट्टीने आप्पासाहेब कुल यांनी संघटनेवरील आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News