पोतराज, शाहीर, लोककलावंत, वाजंत्री यांना किराणा कीट चे वाटप!! घर घर लंगर आणि अहमदनगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम


पोतराज, शाहीर, लोककलावंत, वाजंत्री यांना किराणा कीट चे वाटप!! घर घर लंगर आणि अहमदनगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधि संजय सावंत) 

कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता भारत सरकार, महाराष्ट्र सरकार,अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलीस दल दिवस - रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. अशा परस्थितीत समाजातील काही ठिकाणी गोरगरीब नागरीक जे दररोजचे उपजिवीकेवर आपल्या कुटंबांचे पालन पोषण करतात त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र राज्य प्रशासन समाजातील कोणत्याही व्यक्ती अन्ना शिवाय राहणार नाही याकरता उपाय योजना करत आहेत.

अशी परीस्थीती असतांना समाजातील एक दुर्लक्षीती घटक पोतराज, शाहीर, लोककलावंत , वाजंत्री  समाजातील बांधव व त्यांचे कुटंबांवर  उपासमारीची वेळ आलेली होती.  अहमदनगर शहर पोलिस दलाने याची दखल घेत श्री. अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक

श्री.सागर पाटील अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर  यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे  पोतराज, शाहीर,  लोककलावंत, वाजंत्री समाजातील बांधव त्यांचे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येवू नये या साठी उपअधीक्षक श्री. संदिप  मिटके नगर शहर अहमदनगर, अहमदनगर पोलिस दल  व घर घर लंगर स्वयं सेवी संघटनेचे   श्री. वधवा  यांनी आज दि.२९/०९/२०२० रोजी अहमदनगर पोलिस A.P. लॉन्स येथे पोतराज, शाहीर, लोककलावंत समाजातील बांधवांना गहू,तांदूळ,तेल, दाल व इतर किराणा / जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केलेले आहे. 

घर घर लंगर आणि अहमदनगर शहर पोलीसांनी राबविलेल्या उपक्रमाबददल पोतराज,शाहीर,लोककलावंत यांच्या भावना जाणुन घेतल्या असता त्यांनी संकटाच्या काळात त्यांचे मदतीला धावुन आलेले पोलीस म्हणजे लेकरांना अन्न मिळण्यासाठी ज्या प्रमाणे एक माऊली धडपड करते त्याप्रमाणे आज पोलीस म्हणजे त्यांचेसाठी संकटात धावून आलेले  देवच आहेत अशा भावना व्यक्त करून घर घर लंगर वअहमदनगर शहर पोलिस दलाचे आभार मानले आहेत. यावेळी लोकमत चे संपादक सुधीर लंके, घर घर घर चे हरजित वाढवा, राहुल बजाज, जय रंगलानी, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, अनिष आहुजा, अनिल जग्गी, किशोर मुनोत,राजा नारंग, कमलेश गांधी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News