कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना १००टक्के खावटी अनुदान वाटप करा !! अमित आगलावे


कोपरगाव तालुक्यातील  आदिवासी बांधवांना १००टक्के खावटी अनुदान वाटप करा !! अमित आगलावे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

अनुसूचित जमातीच्या शंभर टक्के लाभार्थी यांना खावटी अनुदान मिळण्याबाबत जिल्हा अध्यक्ष अमित आगलावे यांनी तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांना आज निवेदन दिले आहे .

महाराष्ट्र शासनाने दि. 9 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार सध्या कोविडषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांयांना मदत देण्यासाठी 100% टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सूट देऊन हे योजना 100 टक्के अनुदानित योजना 1 वर्षासाठी (सन 20 20 व 21) करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ 50% टक्के रोख व 50 टक्के वस्तू स्वरुपात देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मा. प्रकल्पाधिकारी साहेब एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर तालुका.अकोलो यांनी दि. 22 -09-2020 रोजी जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देऊन सर्व तालुक्यातील तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना माहिती व द्या या संकल्पनाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी काटे कोरपणे करून कोपरगाव तालुक्यातील पात्र 100 टक्के अनुसूचित जमातीच्या बांधवांना ४०००/- रूपये प्रत्येक पात्र  कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आज दि.29-9-2020 रोजी निवेदन दिले आहे तसेच माहिती स्वरूपात मा.तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय कोपरगाव मा. गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कोपरगाव  यांनाही निवेदन दिले आहे.तसेच या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी गावातील ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून घ्यायचा आहे कारण गेल्या बरेच वर्षापासून ही योजना बंद पडलेली होती आता आपल्या तालुक्याला आपल्या हक्काचा आमदार मिळालेला असल्याने या योजनेचा शंभर टक्के लाभ आपल्या आदिवासी समाजाला होणार आहे तसेच कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी याचा लाभ घ्यायचा आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News