माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेतून कोरोनावर नियंत्रण - सौ. पोर्णिमा जगधने


माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेतून कोरोनावर नियंत्रण - सौ. पोर्णिमा जगधने

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करीत असून नागरिक देखील या आरोग्य तपासणीला सहकार्य करीत असल्यामुळे माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल असा विश्वास सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी व्यक्त केला आहे.

              कोपरगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेचा आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार या  मोहिमेचा सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी गावोगावी जावून आढावा घेतला याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, कोपरगाव तालुक्यात १५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी हि मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहेत. आरोग्य तपासणी कर्मचाऱ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी इंफ्राग्रेड थर्मामीटर, ऑक्सिमीटर,फेसशिल्ड मास्क आदी साहित्य दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी करतांना त्यांचे आरोग्य देखील अबाधित राहत आहे. दैनदिन जवळपास १५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात असून या मोहिमेद्वारे नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत का?, त्याचबरोबर नागरिकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेतली जात आहे. अनलॉक सुरु झाल्यामुळे बरेच निर्बध शिथिल करण्यात आल्यामुळे नियमित व्यवहार सुरु झाले आहे. त्यामुळे साहजिकच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे हे लक्षात महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेले माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करावे असे सौ. पोर्णिमा जगधने यांनी यावेळी सांगितले.

              याप्रसंगी यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ.सोनालीताई साबळे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम,मधुकर टेके,श्रावण आसने,कारभारी आगवन,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,सचिन चांदगुडे,राहुल रोहमारे,देवेन रोहमारे,नरहरी रोहमारे डॉ.वैशाली बदडे, डॉ.ए.पी. खोत,डॉ.पी.जी.भगत,डॉ.सौ. पूजा बोर्डे,विजयराव गायकवाड,संजय जाधव आदी उपस्थित होते.

          

जाहिरात
Search
विडिओ
Recent News