विविध मागण्यांसाठी दिव्यांग संघटनांचे कोपरगाव तहासिलदारांना निवेदन !!


विविध मागण्यांसाठी दिव्यांग संघटनांचे कोपरगाव तहासिलदारांना निवेदन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधि.

 कोपरगाव प्रहारअपंग क्रांती आंदोलन व मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने कोपरगावचे माननीय तहसीलदार साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले

या निवेदनात दिव्यांग बांधवांना शासन निर्णयाप्रमाणे अंतोदय रेशन कार्ड योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे तसेच  दिव्यांगांना दिले जाणारे संजय गांधी निराधार योजनेचे वेतन जवळपास चार महिन्यापासून थकले आहे तरी ते थकित वेतन त्वरित मिळावे.या मागण्यां संदर्भात प्रहारअपंग क्रांती आंदोलन कोपरगाव व मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हायांचे वतीने कोपरगावचे  तहसीलदार माननीय श्री योगेश चंद्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी थकीत वेतन आठ दिवसात दिव्यांगांच्या अकाउंट वर जमा करण्यात येईल व अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांना देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन माननीय तहसीलदार साहेबांनी दिले. याप्रसंगी मनसे दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल अहमदनगर कोपरगाव शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे प्रहार अपंग क्रांती आंदोलन कोपरगाव शहर सचिव संदीप कवडे जिल्हा संघटक परमेश्वर कराळे तालुकाध्यक्ष , शरद खिल्लारी पत्रकार राजेंद्र तासकर राजेंद्र चौहान संगीता सोनवणे तालुका उपाध्यक्ष अक्षय रत्नपारखी आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News