मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पिंपळगाव माळवी व शेंडी येथे घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी पड जमीनीची पहाणी


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने   पिंपळगाव माळवी व शेंडी येथे घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी पड जमीनीची पहाणी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नगर ते पिंपळगाव माळवी रस्ता होण्यासाठी पुढाकार 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने लॅण्ड पुलिंग योजनेच्या धर्तीवर ताबा गुंठा योजना राबविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर पिंपळगाव माळवी व शेंडी येथे घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी पड जमीनीची पहाणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, देवीदास येवले आदिंसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकार पंतप्रधान आवास योजना राबविण्यास असक्षम ठरत असताना, शेतकरी व घरकुल वंचित भागीदारी पध्दतीने ही योजना राबविण्यास मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाने पुढाकार घेतला आहे. नुकतेच इसळक, निंबळक येथील पड जागेची देखील पहाणी करण्यात आली असून, या भागातील शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जागा देण्यास तयारी दर्शवली आहे. पिंपळगाव माळवी व शेंडी येथे देखील पड जमिनी असून, तेथे घरकुल वंचितांचा प्रकल्प उभा राहू शकतो. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नगर ते पिंपळगाव माळवी रस्ता होण्यासाठी वतीने देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे जवळ असलेले हे गाव शहराला जोडले जाणार आहे. तसेच येथील घरकुल प्रकल्पाला देखील प्रोत्साहन मिळून शेतकर्‍यांचा देखील फायदा होणार आहे. तसेच या भागात ग्रामपीठ कार्यान्वीत होण्यास संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News