देऊळगाव गाडा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा शुभारंभ !!


देऊळगाव गाडा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा शुभारंभ !!

विठ्ठल होले दौंड प्रतिनिधी:;

देऊळगाव गाडा. वार्ताहार - दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा .येथे दि 29 सष्टेंबर .रोजी महाराष्ट्र शासनाची "माझे कुटुंब -माझी जबाबदारी" मोहीमेचा शुभारंभ प्रशासक. बी आर मुलाणी . यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेचा लाभ प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येक माणसाला मिळावा यासाठी देऊळगाव गाडा मधील आरोग्य विभाग,सरपंच,ग्रामसेवक यांची मार्गदर्शन बैठक पार पडली असुन प्रत्यक्षात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला .

संबंधितांना या मोहिमे विषयी मार्गदर्शन करताना. भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन. नामदेव नाना बारवकर . म्हणाले की, देऊळगाव गाडा नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाची अत्यंत आवश्यकता आहे.महाराष्ट्र कोविडमुक्त करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याच्या उद्देशाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी,होणार असुन गंभीर आजार निर्दशनास आल्यास त्यावरील उपचाराबाबत प्रत्येक नागरिकास व्यक्तीशःभेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.घरातील सर्व सदस्यांना व्यक्तिशः प्रि-कोविड,कोविड आणि पोस्ट-कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे.कोविड नियंत्रण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे सांगत या मोहीमेसाठी 11 आरोग्यपथके नेमण्यात येत असुन प्रत्येक पथक दररोज 30 घरांना भेट देणार असुन घरातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून एखाद्या व्यक्तीमध्ये ताप, खोकला,दम लागणे,ऑक्सिजन लेव्हल कमी होणे अशी कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याची फिवर क्लिनिकमध्ये कोरोना चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे  . सदस्य अजय गवळी. व कार्यकर्ते .विकास विधाटे. यांनी सांगीतले

तसेच ५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर सुमित हेनमाने सेवा देणार असुन यासाठी आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत,लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असुन त्यादृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर टेम्परेचर गन आँक्सिमिटर, मास्क सॅनिटायझर आदी वस्तू आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तरी राज्य शासनाच्या या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन. मा. सरपंच डी डी बारवकर. यांनी शेवटी  केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी बी चव्हाण .यांनी शासनाच्या मोहिमे विषयी मार्गदर्शन करताना या मोहिमेचा उद्देश,व्याप्ती,कार्य याबाबत माहिती दिली. सदर प्रसंगी  अधिकारी व कर्मचारी ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व  आरोग्य सेविका व आशा कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News