सुरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महीलांना मिळणार का संधी?


सुरेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महीलांना मिळणार का संधी?

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

सुरेगाव वार्ताहार -कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व  वर्षानुवर्षे काळे गटाची सत्ता असलेल्या सुरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील वाल्मिक कोळपे यांचा कार्यकाल संपला असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंचाकडे सुपुर्द केला आहे.आता रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची माळ कोणाच्या  गळ्यात पडणार याचा फैसला होणे बाकी आहे.

 प्रथमच झालेली लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होवून सरपंचपदाची माळ काळे गटाचे शशिकांत वाबळे यांच्या गळ्यात पडली तर उपसरपंचपद पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिक कोळपे यांचे सुपुत्र व युवा

नेते सुनील कोळपे यांना रोटेशन पध्दतीने दोन वर्षे करिता देण्यात आले होते.त्यांनी दोन वर्षामध्ये अनेक विकासकामे करून काळे गटाचा विश्वास संपादन केला आहे.सध्या ग्रामपंचायतीच्या एकुण १७ सदस्यांपैकी काळे गटाकडे १५,तर कोल्हे गटाचे २ सदस्य आहे.त्यामुळे उपसरपंचपद काळे गटाला मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

सुरेगाव ग्रामपंचायत मध्ये महिला सदस्यांचे संख्याबळ नऊ असल्याने आमदार आशुतोष दादा काळे महिलांना संधी देणार का?याची उत्सुकता सुरेगावकरांसह संपूर्ण तालुक्याला  लागली आहे.परंतु

आजपर्यतचा इतिहास बघता 

बहुतेक अंदाज १० वर्षापासून  महिला या उपसरपंच पदापासून उपेक्षितच राहिल्या आहे यावेळी तरी त्यांना संधी मिळेल का अशी कुजबुज सुरेगाव येथील महीला वर्गात सुरू आहे

 प्रथमच महीला उपसरपंचाची निवड होणार असेल तर यामध्ये काळे गटाचे विश्वासू गणेश सुपनर यांच्या पत्नी सौ.वनिता सुपनर  तसेच काळे कारखान्याचे निष्टांवत कामगार म्हणून अरुण लोंढे यांच्या पत्नी सौ.सविता लोंढे   तसेच भाऊसाहेब कदम यांच्या पत्नी सौ शामला कदम यांना   संधी दिली जाणार का?याची उत्सुकता लागलेली असुन तरुण सदस्यांना संधी दिली जाते की काय? हे ही अद्याप गुलदस्त्यात असल्याने या निवडीकडे संपूर्ण सुरेगावा सह तालुक्याचे लक्ष लागलेले असून चर्चेला उधाण आले आहे.महिला सद्स्या मध्ये सौ.सुपनर,कदम आणि लोंढे यांच्या नावाची तर जेष्ठा मध्ये डॉ. सय्यद,निकम आणि हाळनोर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते.या व्यतिरिक्त तरुणांना,महिला की जेष्ठांना संधी? या करिता अजून आठ दिवस वाट पहावी लागणार असल्याने सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News