पुणे जिल्हा मराठी कवी, लेखक संघटनेची कार्यकारणी जाहीर, कवी लेखक यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू - स्वाती आनंद


पुणे जिल्हा मराठी कवी, लेखक संघटनेची कार्यकारणी जाहीर, कवी लेखक यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू - स्वाती आनंद

विठ्ठल होले पुणे

प्रतिनिधी ---  मराठी कवी लेखक संघटनेची पुणे जिल्हा कार्यकारणीच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाती आनंद तसेच सचिवपदी रमेश जाधव, उपाध्यक्षपदी सीताराम नरके यांची तर उपसचिव- सौ.सुनीता काटम, कोषाध्यक्ष रोहिदास होले, उपकोषाध्यक्ष- रवींद्र डांगे संघटक- राहुल निकम यांची निवड संघटनेचे अध्यक्ष दिनकर दाभाडे यांनी नुकतीच जाहीर केली.

कवी, लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्याय हक्क जपले जावे त्यांना येणाऱ्या अडचणी,त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरावर या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी असून राज्यस्तरीय कार्यकारणीत विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, खान्देश अशा विभाग प्रमुखपदी नियुक्त्या केल्या आहेत. वसंत आबाजी डहाके, लक्ष्मीकांत देशमुख, दासू वैद्य, दा. गो. काळे,रेखा ठाकूर, रमेश इंगळे, मंगेश काळे, मनोज पाठक, गणेश कनाटे, दिनकर मनवर, रवींद्र इंगळे चावरेकर, शैलेश पांडे, किरण येले , शिवराम भोंडेकर, प्रमोद मुनघाटे, राजेंद्र मलोसे असे अनेक जेष्ठ लेखक, कवी या संघटेनचे सल्लागार सदस्य आहेत. संघटनेत पाचशेपेक्षा अधिक सदस्य असून ते राज्याच्या निरनिराळ्या भागात कार्यरत आहेत.सुप्रसिद्ध रहस्यमय कथा,कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांच्या विपन्नावस्थेत पणजी येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाशी बोलणी करून त्यांना आरोग्य सुविधा,आर्धिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले, जेष्ठ लेखक उत्तम बंडू तुपे यांना त्यांच्या वृद्धपकाळात संघटनेच्या माध्यमातून पुण्यात पक्के घर मिळवून दिले. यापुढेहि कवी व लेखकांच्या हक्कासाठी संघटना अग्रेसर राहिल.राज्यातील मोठ्या शहरात साहित्यिक भवन उभारणी तसेच लेखक कवींना रेल्वेत प्राधान्याने रिझर्वेशन मिळणेबाबत,शासनातर्फे मोफत आरोग्य सुविधा मिळावी अशा अनेक मागण्या शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ कवी कांदबरीकार दिनकर दाभाडे यांचा संघटनेचे अधिवेशन घेण्याचा मानस आहे.या संघटनेत सहभागी होण्यासाठी ७०५७७४९३४६, ९५०३२१३६०७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News