इंटरनॅशनल योंगमोडो आणि भारतीय योंगमोडो फेडरेशन यांनी संयुक्त रित्या ऑन लाईन ब्लॅक बेल्ट परीक्षांचे आयोजन, प्रविण होले यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड


इंटरनॅशनल योंगमोडो आणि भारतीय योंगमोडो फेडरेशन यांनी संयुक्त रित्या ऑन लाईन  ब्लॅक बेल्ट  परीक्षांचे आयोजन, प्रविण होले यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड

विठ्ठल होले पुणे

प्रतिनिधी ---   20  सप्टेंबर रोजी  इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन तथा भारतीय योंगमूडो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट सेमिनार व  ब्लॅक बेल्ट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या ,या परीक्षेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय योंगमुडो फेडरेशनचे प्रमुख आंतरराष्ट्रीय परीक्षक,मास्टर: हेऑन ताय क्वॉन,(कोरिया), मास्टर: मिन चूल कांग(कोरिया), राष्ट्रीय परिक्षक मास्टर, रोहित नारकर (मुंबई)(संस्थापक अध्यक्ष भारतीय योंगमुडो महासंघ),मास्टर, राणा अजय सिंग (छत्तीसगड (महासचिव,भारतीय योंगमुडो महासंघ),मास्टर, प्रविण होले (पुणे) (महासचिव, महाराष्ट्र योंगमुडो असोसिएशन)हे मान्यवर यावेळी उपस्थित होते, या पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये योंगमुडो या खेळाचे 3rd DAN ब्लॅक बेल्ट मिळवणारे मास्टर प्रविण होले सर हे भारतीय वेस्ट झोनमध्ये तसेच महाराष्ट्रातील पहिले खेळाडू होण्याचा मान व आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाच उत्कृष्ट खेळाडूंनमधे त्यांची निवड झाली आहे,

प्रविण होले सर योंगमुडो या खेळाचे विद्यमान महासचिव म्हणून कार्य करत आहेत,,,

याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे,,,तसेच भारतीय योंगमुडो फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष, मा. श्री. रोहितजी नारकर सर, महासचिव, मा. श्री. राणा अजय सिंग यांनीही होले सरांचे कौतुक व अभिनंदन केले,, सरांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News