श्रीगोंदयात सोमवारी २० जण कोरोना बाधीत : एकूण बाधीत १६०० पार.


श्रीगोंदयात सोमवारी २० जण कोरोना बाधीत : एकूण बाधीत १६०० पार.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.२७: श्रीगोंदा तालुक्यात सोमवार दि.२८ रोजी ९० रॅपिड अँटीजन चाचण्यांत १४ जण पॉझिटिव्ह आले तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावाच्या अहवालात ५ जण पॉझिटिव्ह आले.व दौंड येथे खाजगी चाचणी केलेला १ जण पॉझिटिव्ह आला.त्यामुळे सोमवारी एकूण २० जण पॉझिटिव्ह झाल्याने एकुण संक्रमितांची संख्या १६१२ झाली आहे. दि.२८ रोजी ५४ जणांचे घशातील स्राव घेतले. २७ जण बरे होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या १४४७ झाली आहे. सद्यस्थितीला ६७ जण शासकीय कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी केंद्रात ८७ जण उपचार घेत आहेत.एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

        दि.२८ रोजी श्रीगोंदा शहरातील  रोहिदास चौक-१,होळी गल्ली-२, पेडगाव रोड-१,स्टेट बँक ऑफ इंडिया-१,अवधूत नगर-२ असे ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ग्रामीण भागात शेडगाव-२,टाकळी कडेवळीत-२,कोळगाव-२,सांगवी दुमाला-१,कोथूळ-१,अनगरे-१, काष्टी-१, जंगलेवाडी-१,निमगाव खलू-१ तर चिंभळा येथे १ जण पॉझिटिव्ह आला.अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News