खुनाचा प्रयत्न तसेच अट्रोसिटी गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक


खुनाचा प्रयत्न तसेच अट्रोसिटी गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

विठ्ठल होले पुणे

सासवड प्रतिनिधी -- सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून सासवड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे,त्याची सविस्तर माहिती अशी आज दि. २८/०९/२०२० रोजी बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना  गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या  बातमी वरून माळेगाव येथे  सासवड पो स्टे गु र नं १०६/२०२० भा द वी 307, 324, सह अनु  जाती जमाती  प्रतिबंधक कायदा  1989 कलम 6 सुधारीत कायदा 2015 चे 3(१) (r)(s) 3(2) (va) या गुन्हातील फरार  आरोपी नामे नितीन उर्फ बापू उल्हास जाधव वय 32 वर्षे रा इंदिरा नगर, सासवड ता. पुरंदर जि. पुणे हा  गुन्हा घडले पासून सुमारे  गेली सहा महिने पासून फरार होता  त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास करीत सासवड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे

 सदरच्या आरोपीवर दाखल असलेले गुन्हे 

१)सासवड पो स्टे गु र नं  142/2014  भा द वी का कलम 307,  143, 147 इतर

२) सासवड पो स्टे गु र नं  90/2018 भा द वी का कलम  326,325,  109,34 इतर सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो. हवा. अनिल काळे,पो. हवा. रविराज कोकरे, पो. हवा. ज्ञानेशवर क्षीरसागर, पो. ना.  विजय कांचन, पो. शि. धिरज जाधव,पो. शि. अक्षय नवले यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News