पंतप्रधान मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्ताने सांगवी येथील झोपडपट्टीत गोरगरिब व गरजु लोकांना मास्क वाटप


पंतप्रधान मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्ताने सांगवी येथील झोपडपट्टीत  गोरगरिब व गरजु लोकांना मास्क वाटप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगवी येथील  झोपडपट्टी याठिकाणी गोरगरिब व गरजु लोकांना मास्क वाटप करण्यात आले. 

 सध्या कोरोनाच्या काळात पेशंटची संख्या सर्वत्र वाढत असून काळजी घेणे गरजेचं आहे. मास्क व सॅनिटायझर वापरणे आवश्यक असल्याने ती गरज ओळखून हा कार्यक्रम घेण्यात आला.

     यावेळी बारामती तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे, दिपक खुडे, सुरेश पवार, ओमकार खुडे, अनिल पवार आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News