ऑल इंडिया युथ फेडरेशन,ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने क्रांतीचौकात शहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन


ऑल इंडिया युथ फेडरेशन,ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने क्रांतीचौकात शहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन

शेवगाव: ऑल इंडिया युथ फेडरेशन,ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने क्रांतीचौकात शहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले  शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

 - ऑल इंडिया युथ फेडरेशन ,  ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील क्रांतीचौकात शहिद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी  शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शहिद भगतसिंग अमर रहे, शहिद भगतसिंग के देश में जात पात धर्म का झगडा नही चलेगा अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला. या वेळी बोलताना भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे म्हणाले, भारतीय  स्वातंत्र्याच्या लढ्यात देश हितासाठी हसत हसत फासावर जाऊन बलिदान देणारे शहिद भगतसिंग हे देशातील युवकांचे प्रेरणास्थान आहे. या वेळी   प्रेम अंधारे, अक्षय खोमणे, वाहभभाई शेख, कातकडे सर, कमलेश लांडगे, सतिश गायकवाड, किरण गायकवाड, जावेदभाई बागवान, पांडुरंग देशमुख, सुहास मगर, सुरेश लांडे, शोरन शेख व गणेश कांबळे यांच्यासह शहिद भगतसिंग हॉकर्स युनियनचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------

( दि. २८ सप्टेंबर २०२० )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News