कोरोना काळात मोफत आरोग्य शिबीर घेतल्याबद्दल व कोरोना योध्दा सन्मान मिळाल्याबद्दल विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार


कोरोना काळात मोफत आरोग्य शिबीर घेतल्याबद्दल व कोरोना योध्दा सन्मान मिळाल्याबद्दल विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

कोरोनाने माणूस माणसापासून दुरावत असताना फिनिक्सने माणुसकी जपली -झंवर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - महाराष्ट्र हेल्थ फाऊंडेशन, मुंबईच्या वतीने फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आल्याबद्दल रोकडेश्‍वर हनुमान मंदिर ट्रस्ट, हरदिन मॉर्निंग ग्रुप, बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

रोकडेश्‍वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा उद्योजक मन्नूशेठ झंवर व बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश त्रिमुखे, किरण फुलारी, अ‍ॅड.किरण सोनी, प्रदीप रासने अर्जुन थोरात, शरद क्यादर, अजय खंडागळे, विकास निमसे, किशोर बोरा, राजू कांबळे, अनिल इवळे, संदीप घुले, किरण काकडे, संतोष मुथा, बजरंग दरक, मुकेश मुथियान, अनिल दुगड, मधुकर खताल आदि उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व विविध आरोग्य शिबीर घेतल्याबद्दल या कार्याची दखल घेत बोरुडे यांना कोरोना योध्दा सन्मान मिळाला आहे. मन्नूशेठ झंवर म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनने मोठे सामाजिक कार्य उभे केले असून, कोरोनाच्या टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून घेतलेले शिबीराचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाने माणूस माणसापासून दुरावत असताना फिनिक्सने माणुसकी जपली. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने आरोग्य शिबीर घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. माऊली गायकवाड यांनी टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. ही जाणीव ठेऊन फिनिक्सने घेतलेले शिबीर प्रेरणादायी आहे. त्यांचा होत असलेला सन्मान नगरकरांच्या दृष्टीने भूषणावह असल्याची भावना व्यक्त केली. पिटू बोरा यांनी यांनी फिनिक्स फाऊंडेशन सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठा आधार असल्याचे सांगून, फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशन सर्वसामान्यांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी कटिबध्द आहे. या संकटकाळात आरोग्यसेवा मिळणे मोठा प्रश्‍न बनला असताना फाऊंडेशनने पुढाकार घेऊन नियमांचे पालन करुन आरोग्य शिबीरे घेतली. शिबीराचा तब्बल 2680 गरजूंनी लाभ घेतला. तर 348 ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. मनुष्यरुपी ईश्‍वरसेवा या भावनेने कार्य चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News