दौंड शहरासह तालुक्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ,लक्षणे असूनही लपवतात आजार


दौंड शहरासह तालुक्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ,लक्षणे असूनही लपवतात आजार

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात रुग्ण वाढले आहेत,शहरात आज 13 रुग्ण आढळले आहेत SRPF  2, तर परिसरातील 3 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

आज दिनांक 28/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 90 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 18 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 72 व्यक्ती चे report negative आले आहेत Positive मध्ये,महिला-- 5,पुरूष --13

प्रभाग -दौंड शहर=13,इतर ग्रामीण=3,Srpf=2 हे  सर्व व्यक्ती 14  ते  76 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.तर यवत येथील कोविड सेंटर येथे 27/9/20 रोजी 77 लोकांचे घस्यातील स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 9 जण नव्याने कोरोना बाधीत आले असल्याचे डॉ इर्वाडकर यांनी सांगितले आहे,त्यामध्ये 5 पुरुष तर 4 महिला आहेत,यवत 6, वाळकी 1, भांडगाव 1, बोरीपार्धी  1 असे व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. हे सर्व व्यक्ती 12ते 65 वर्ष वयोगटातील आहेत,रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे,ग्रामीण भागात लोक गांभीर्याने दखल घेत नाहीत,आणि बाधीत व्यक्तीच्या घरातील व्यक्तींशी दूजाभाव केला जात आहे, त्यांना मानसिक आधाराची गरज आहे,घरात रुग्ण सापडल्यामुळे ते कुटुंब अगोदरच भयभीत झालेले असते आणि आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे असे पाहतात की त्यांनी काहीतरी मोठा गुन्हा केला आहे,कोणीही अशी चुकीची वागणूक देऊ नये असे महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनल कडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News