दादाचौधरी विद्यालयातर्फे सेनापती दादा चौधरी यांची पुण्यतिथी साजरी!! दादा चौधरी यांचे कार्य प्रेरणादायी-अजित बोरा


दादाचौधरी विद्यालयातर्फे सेनापती दादा चौधरी यांची पुण्यतिथी साजरी!! दादा चौधरी यांचे कार्य प्रेरणादायी-अजित बोरा

सेनापती दादा चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करताना हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक श्री.बोडखे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,दीपक आरडे,नितीन केणे,अजय महाजन,विजय राहिंज,दिनेश मूळे, दीपक शिंदे,प्रशांत शिंदे,गोवर्धन पांडुळे,देवेन जोगळेकर ,शिवाजी भोंडवे,मनोज हिरणवाळे,आप्पा सकट आदी.(छाया -अमोल भांबरकर)                        

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) अनाथ विदयार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी कै.दादा चौधरी यांनी राष्ट्रीय पाठशाळा व राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली.दादा चौधरींनी प्रसंगी तुरुंगवास भोगला.सत्याग्रहाचे नेतृत्व केले.लोकमान्य व नवशक्ती वृत्तपत्राचे संपादन केले.शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती.सेनापती दादा चौधरी यांचे कार्य प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी केले.                                              

   हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयातर्फे सेनापती कै.कृष्णाजी नरहर तथा दादा चौधरी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय पाठशाळेतील स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांच्या समाधीस्थळी जाऊन हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक श्री.बोडखे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,दीपक आरडे,नितीन केणे,अजय महाजन, विजय राहिंज,दिनेश मूळे, दीपक शिंदे,प्रशांत शिंदे,गोवर्धन पांडुळे, शिवाजी भोंडवे,मनोज हिरणवाळे, आप्पा सकट आदी उपस्थित होते.   

         सूत्रसंचालन नितीन केणे यांनी केले तर आभार दीपक शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.                                                                                    


जाहिरात
Search
विडिओ
Recent News