पंचनामे करताना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना संयुक्त एकत्रित ठेऊन पंचनामे करावे:-सौ.हर्षदाताई काकडे


पंचनामे करताना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना संयुक्त एकत्रित ठेऊन पंचनामे करावे:-सौ.हर्षदाताई काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करताना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना संयुक्त एकत्रित ठेऊन पंचनामे करावे अशा आशयाचे निवेदन जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी तहसीलदार सौ.अर्चना पागीरे/भाकड यांना शेवगाव येथे दिले. निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव तालुक्यात चालू वर्षी जून पासून गेल्या ३० वर्षात कधी न झाला एवढा पाऊस झाला. सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, भुईमुग, तूर व फळबाग आदि मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी व लागवड शेतामध्ये केली होती. पाऊस असल्याने पिके चांगली आली. परंतु चालू सप्टेंबर महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र होत असलेल्या अतिवृष्टीने कपाशी, बाजरी, ऊस, मका आदि पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत. शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. जी कपाशी आली त्यावर देखील बोंडअळी पडली आहे. काही भागात मशागत खर्चही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शासनाने कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करताना गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी संयुक्त येऊन पंचनामे करावे. संयुक्त पंचनामे केल्यास शेतकऱ्यांचे फळबागेचे देखील पंचनामे होतील. त्यासाठी फळबागांचा स्वतंत्र पंचनामा करण्याची गरज पडणार नाही व फळबाग शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम लवकर मिळेल. अगोदरच covid-19 मुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकरी आर्थिक संकटात भरडला गेला आहे. त्यामुळे त्वरित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी असेही निवेदनात म्हंटले आहे. निवेदन वेळी शिवाजी कणसे, प्रहारचे संदिप बामदळे, राजेंद्र खेडकर, संजय शिंदे, भागचंद्र काळे, नवनाथ गाढे, भिमराज गाढे आदी यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News