विठ्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी --- कोरोना महामारिमुळे शेतमालासह सर्व व्यापार ठप्प झाले आहेत,सर्वजण मेटाकुटीला आले आहेत,शेतकऱ्यांच्या बाबतीत तसेच झाले आहे,हॉटेल उपहारगृहे, ढाबे हे सर्व बंद असल्यामुळे कांद्याची मागणी घटली,त्यामुळे साठवून ठेवला तर खराब होतो आणि बाजारात आणला तर बाजारभाव मिळत नाही, इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली होती,परंतू मागील आठवड्यापासून कांद्याने चांगलीच उसळी घेतली आणि शेतकरी सुखावला परंतू बाजार भाव कमी जास्त होत असल्याने कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे,दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये थोडाफार समाधानकारक बाजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समिश्र समाधान पहायला मिळत आहे, परंतू बाजार भाव वाढल्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे,आज दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला कमीत कमी 2000 तर उचांकी भाव 4000 रुपये भाव मिळाला आहे,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तात्यासाहेब टुले,मोहन काटे,अडतदार असिफ शेख,दत्तू येडे,नवनाथ मेरगळ,तत्यासो शिवाजी जाधव तसेच व्यापारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.