धारणगाव शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू !!


धारणगाव शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकुळ घातला असुन अगोदरच कोरोना महामारीमुळे मालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात निर्सगकोपल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामधील ऊभ्या पिकात पाणी साचल्याने शेतक -याचे मोठे नुकसान झाले आहे त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याचा सुचना केल्या होत्या.या पाश्र्वभुमीवर दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे टाकळी येथील बंधाऱ्याचा भरावा फुटुन पाणी  नजिकच्या धारणगाव शिवारातील शेतात पाणी घुसल्याने उभ्या असलेल्या मका,बाजरी,सोयाबिन पिकांचे नुकसान झाले असुन निर्सगाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे.या पाश्र्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी सदर भागाला भेट देउन तहसिलदार योगेशचंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढावा यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार

धारणगाव शिवारातील सहाचारी परीसरातील येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी व पंचनामे मा.तहसिलदार साहेब यांच्या सुचनेनुसार व तालुका कृषी अधिकारी साहेब यांचा मार्गदर्शनाखाली तसेच गाव कामगार तलाठी धनंजय पऱ्हाड, कृषी सहाय्यक सोळसे मॅडम, ग्रामसेवक पुनम अहिरे सरपंच नानासाहेब चौधरी यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले आहे.

यावेळी निखिल जाधव,श्रीकांत वहाडणे, रामदास रणशुर, नानासाहेब थोरात,अमोल चौधरी यांच्या सह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News