ऑक्सिजन, व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देणे म्हणजेआमदारांना उशिरा सुचलेले शहाणपण - आप्पासाहेब दवंगे


ऑक्सिजन, व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देणे म्हणजेआमदारांना उशिरा सुचलेले शहाणपण - आप्पासाहेब दवंगे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी:

कोपरगांव - आजच्या कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात तातडीने उपचार मिळावे म्हणून विदयमान आमदारांनी मोठा गाजावाजा करून कोपरगावला कोवीड सेंटर सुरू केले, परंतु या ठिकाणी रूग्णांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत असल्याचे निदर्शनास आले आहे, या आरोग्याच्या कामातही लोकप्रतिनिधीनी रूग्णांची फसवणुक चालवलेली असुन साहित्य उपलब्ध करुन देणे म्हणजे आमदारांना उशिरा सुचलेले शहाणपण हे आमदारांनी यामाध्यमातुन दाखवुन दिले असल्याची टिका सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब दवंगे यांनी व्यक्त केली आहे.  देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे गांभीर्य लक्षात घेवुन सरकारने आमदारांना विकास निधीचा वापर करुन साहित्य उपलब्ध करुन देण्याचे सुचना केलेले होते. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना स्वतःच्या तालुक्यात उपचारासाठी आॅक्सिजन, बेड, व्हेंटीलेटर आदि कोणत्याही सोयसुविधा नसल्याने नाईलाजस्तव दुस-या तालुक्यात सोय सुविधा उपलब्ध असल्यामुळे उपचारासाठी जावे लागते हे दुर्भाग्य आहे. आमदारांनी विकास निधीचा उपयोग करुन साहित्य उपलब्ध केले असते तर तालुक्यातील 31 रुग्णांचा मृत्यु झाला नसता. सध्या कोरोना महामारीचे मोठे संकट आपल्या देशावर आलेले आहे. लाॅकडाउनमुळे व्यावसायावर मोठा परिणाम झाल्याने आर्थीक परिस्थिती बिकट झालेली आहे. कोरोना सारख्या संसर्ग जन्य आजारामुळे दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आर्थीक परिस्थितीमुळे खाजगी रूग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करून उभारलेल्या कोविड सेंटरचा आसरा घेणा-या रूग्णांचा भ्रमनिरास होत आहे, तेथील असलेल्या दुरावस्थेमुळे रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एस एस जी एम काॅलेज येथे कोबिड सेंटर उभारण्यात आले असल्याचा मोठा गाजावाजा केला, केवळ बैठका घेउन जनतेप्रती कळवळा दाखविला जातो, मात्र कार्यवाही होत नाही. प्रशासनानेही लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे कौतुक केल्याचे मथळे वृत्तपत्रात छापून आणले. परंतु बातम्याशिवाय नागरीकांच्या हाती काहीही पडले नसल्याचे दिसून आले आहे. उपचाराच्या नावाखाली दाखल करून घेतलेल्या रूग्णांना उपचारही वेळेवर मिळत नाही, त्यांची हेळसांड होते, आॅक्सीजनची सोय नाही, नगरला जाईपर्यंत दुर्दैवाने काही अघटीत घडते, त्यामुळे याठिकाणी सर्वसोयींयुक्त कोविड सेंटर उभारण्याची गरज असतांना केवळ बैठका आणि बातम्या देण्यास प्राधान्य दिले जाते. ही तालुक्याच्या दृप्टीेने दुर्दैवाची बाब आहे. आजपर्यंत सुमारे 1734 नागरीक कोरोना बाधित झाले तर 31 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास लोकप्रतिनिधींना  पुर्णपणे अपयश आले असल्याचे आप्पासाहेब दवंगे म्हणाले.आबासाहेब मोरे म्हणाले की, निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक पदाधिकारी व सदस्य पर्यावरण संवर्धन हे एकच ध्येय समोर ठेऊन कार्य करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून, ते जगविण्यासाठी देखील वर्षभराचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यात बीजरोपण मोहिम राबविण्यात आली असून, त्याचा देखील चांगला परिणाम मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आज केलेले कार्य भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. तर संघटनेच्या उपक्रमासाठी चंदुकाका सराफचे अतुल शहा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. अतुल शहा यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, यासाठी राज्यभर संघटनेच्या कार्याने आपण भारावलो आहे. अनेक संघटना सामाजिक कार्यात गुंतले असून, पर्यावरण संवर्धन हे मोठे सामाजिक कार्य आहे. या कार्यासाठी आपण सहकार्य केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य कार्याध्यक्ष विलास म्हाडिक यांनी मंडळाच्या या वर्षीच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. या बैठकित राजेंद्र सावंत, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रियवंदा तांबटकर, विलास शेडाळे, प्रमोद मोरे, बाळासाहेब कणसे, माधव केंद्रे, नाना पाटील, बाबासाहेब महापुरे, अ‍ॅड. सौ. आंधळे, प्रणिता पाताडे, उमाजी बिसेन, सुहास गावीत, रामदास खवसी, कचरु चांभारे, बाळासाहेब चोपडे, अनिल लोखंडे, संजय भापकर, दत्तात्रय मंचरे, प्रमोद काकडे, सुनिल दिघे, नंदकुळे शिवप्पा, तावरे, कुंभकर यांनी सहभाग नोंदवला. आभार मारुती कदम यांनी मानले. वनश्री प्रतिज्ञाचे वाचन करुन बैठकिचा समारोप झाला. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News