महाराष्ट्र राज्यातील लिपीकवर्गीय कर्मचारी यांच्या वेतनातील त्रूटी दुर करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक- उमाकांत सूर्यवंशी.


महाराष्ट्र राज्यातील लिपीकवर्गीय कर्मचारी यांच्या वेतनातील त्रूटी दुर करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक- उमाकांत सूर्यवंशी.

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड

महाराष्ट्र राज्यातील लिपीकवर्गीय कर्मचारी यांच्या वेतनातील त्रूटी दुर करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केल्याची माहिती संघटनेच्या वतीने उमाकांत सुर्यवंशी यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय लिपीकवर्गीय कर्मचारी यांचे प्रमाण साठ टक्केच्या आसपास आहे . परंतु चौथ्या वेतन आयोगापासुन लिपीक कर्मचारी यांचेवर वेतनाच्या बाबतीत शासनाकडून अन्याय झाला असल्याने लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे  लिपींकाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाचे मंत्री ना. बच्चुभाऊ कडु आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री ना. दत्तामामा भरणे  यांना निवेदन देउन बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली .सदर बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकवर्गीय हक्क परीषदेचे राज्यअध्यक्ष विजय बोरसे, सातलींग स्वामी बापूसाहेब कुलकर्णी, गिरीश दाभाडकर, शिवाजी खांडेकर,शेखर गायकवाड, यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News