केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाचा श्रमिकराज कामगार संघटना कोपरगाव तालुक्याच्यावतीने जाहीर निषेध... !!


केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाचा श्रमिकराज कामगार संघटना कोपरगाव तालुक्याच्यावतीने जाहीर निषेध... !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव-दि.२६-९-२० श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने कोपरगाव येथे तातडीची बैठक होऊन संसदेत मंजूर झालेल्या कामगार व शेती विधेयकामुळे विरोधकांनी संसदेत धुमाकूळ घातला आहे असे श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले संघटित आणि असंघटित या दोन्ही ही क्षेत्रातल्या कामगारांना काही नव्या प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळेल असा सरकारचा दावा आहे . सर्व कामगारांना त्यांची नियुक्ती पत्र देणे त्यांचे वेतन डिजिटल पद्धतीने करणार अनिवार्य असेल. वर्षातून एक वेळा कामगारांची आरोग्य चाचणी करून घेणे कंपन्यांना बंधनकारक असेल. यापुढे तीनशे पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या कंपन्या सरकारच्या अनुमतीशिवाय कर्मचाऱ्यांची संख्या कमी करू शकतात. किंवा कंपनी बंद करू शकतात. याआधी मर्यादा शंभरपेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांसाठी होती. पण सरकारने ही मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे हायर अँड फायर ही संस्कृती बळावेल अशी भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे

यापुढे कंपन्यांना जास्तीत जास्त कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर वर ठेवता येतील याची मुभा या नव्या विधयकान  दिली आहे. महिलांचे कामाचे तास हे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतील सात नंतर त्यांच्या सुरक्षेची सुरक्षेची जबाबदारी ही संपूर्णपणे कंपनीची असेल यापुढे संप करण्यासाठी कामगार संघटना किमान दोन महिने संपर्क करावा लागणार आहे शिवाय कामगार संघटनांच्या रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा सरकारने जाचक अटी टाकल्या आहेत

कामगार विधेयकातील काही तरतुदींना कामगार संघटनांचा जोरदार विरोध होत आहे.

2019 ची आधी पहिल्या टर्ममध्ये हे विधायक सरकारने मांडले होते पण तेव्हा हे विधायक स्थायीसमितीकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर काही नव्या बदलांसह हे विधायक पुन्हा सरकार संसदेत घेऊन आले.असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. यावेळी श्रमिकराज कामगार संघटनेने केंद्र सरकारचा कामगार विरोधी व शेती विरोधी संसदेत मंजूर झालेल्या तरतुदीचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अजय विघे, सचिव- गणेश पवार , उपाध्यक्ष राजेंद्र पगारे , कोषाध्यक्ष-कुणाल झाल्टे (कीर्तिकर),विलास गवळी , कैलास साळवे,एडवोकेट सुरेश मोकळ,सौ.सविता साळवे,   सौ.सविता वाघ,अशोक जमधडे राहुल धिवर,रंभाजी रणशुर,शंकर घोडेराव,सोमनाथ गायकवाड,सौ सुनीता पवार,बाळासाहेब गायकवाड,इंद्रकुमार पगारे , संजय जगताप,अजाब पाटील,  अरविंद विघे,ज्ञानेश्वर लोखंडे आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News